नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकांऱ्यांना मंदिर परिसरात अगोदरच उपस्थित असलेल्या भाजपाच्या पदाधिकांऱ्यांकडून जी धक्काबुक्की व दमदाटी करण्याचा जो प्रकार घडला त्याबद्दल भाजपाच्या गैरवर्तनाचा पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुधीर भोसले यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत भाजपाच्या त्या पदाधिकांऱ्यांवर पोलीसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी प्रसिध्दी पत्रकाद्वारे भोसले यांनी केली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे व जिल्हा सरचिटणीस सुरज पेंडाल हे केवळ दर्शनासाठी गेले होते. निषेध आंदोलन करण्याचे कोणतेही नियोजन नव्हते .पंरतू भाजपा आघाडीचे प्रदेशअध्यक्षां समोर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व त्यांचे सहकारी पदाधिकांऱ्यांनी शिंदे व पेंडाल यांना ज्याप्रकारे धक्काबुक्की केली त्याचा निषेध करत अरेरावी व दमदाटी प्रकार करणाऱ्या त्या भाजपाच्या दोषी पदाधिकांऱ्यांवर पोलीसांनी कठोर कारवाई करावी. पुढील काळात असे कृत्य घडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कडून जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशाराही सुधीर भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.