ताज्याघडामोडी

लिव्ह-इन पार्टनरचा घरातच मृत्यू, विवाहित प्रियकर गायब… एक चिठ्ठी अन् सारं उलगडलं

एका ४८ वर्षीय लेफ्टनंट कर्नलला पश्चिम बंगालच्या कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे. कर्नलवर त्याच्या ३७ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्याच्या लिव्ह-इन पार्टनरचा मृतदेह पाच दिवसांपूर्वी बॅरकपूर कॅन्टोन्मेंट येथील त्याच्या अधिकृत क्वार्टरमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. तेव्हापासून पोलीस लेफ्टनंट कर्नलचा शोध घेत होते. आरोपी बॅरकपूर आर्मी हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ डॉक्टर आहे, तर त्यांची लिव्ह-इन पार्टनर प्रज्ञा दीपा हलदर सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि लेखक होती.

पोलिसांनी सांगितले की, लष्करी अधिकारी कौशिक सरबाधिकारी यांना सुसाईड नोट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रज्ञा यांनी कौशिकच्या अत्याचाराबाबत लिहिले होते. पोस्टमॉर्टममध्ये प्रज्ञा दीपा हलदरच्या शरीरावर जखमांच्या खुणाही आढळून आल्या.

प्रज्ञा हलदर यांचा मृतदेह सापडल्यानंतर कौशिक सरबाधिकारी बेपत्ता होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र, पकडल्या गेल्यानंतर त्यांनी आपण आजारी असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी बॅरकपूर कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्याला रुग्णालयातूनच अटक केली. कोर्टात हजर केल्यानंतर कौशिकला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *