ताज्याघडामोडी

पावसाबाबत आनंदाची बातमी; या तारखेपासून महाराष्ट्रातही धुवाँधार बरसणार, हवामानतज्ज्ञांचा अंदाज

‘बिपर्जय’ वादळ गुजरातमधून राजस्थान व मध्य प्रदेशात सरकले असले, तरी गुजरातमधील त्याची तीव्र अजूनही पूर्णपणे संपलेली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून विविध जिल्ह्यांत सुसाट वारे वाहत आहेत. अर्थात, अजून काही दिवस असेच वारे वाहात राहणार आहेत आणि २३-२३ जूननंतर पावसाला सुरुवात होईल. जूनचा शेवटचा आठवडा हा धुवाँधार पावसाचा असेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.

‘बिपर्जय’ वादळाने गुजरातमध्ये कहर केला. त्यानंतर ते आता राजस्थान व मध्य प्रदेशकडे सरकले आहे. त्याचे परिणाम दोन्ही राज्यांतील विविध शहरांमध्ये दिसू लागले आहेत. असे असले तरी त्याची गुजरातमधील तीव्रता पूर्णपणे कमी झालेली नाही आणि गुजरातमधील वादळाचा परिणाम म्हणूनच छत्रपती संभाजीनगर व इतर जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून सुसाट वारे वाहात आहेत.

हे वारे अजून काही दिवस असेच वाहात राहणार आहेत. अर्थात, वारे वाहणार असले, तरी वादळासारखी स्थिती नसेल. मात्र, पाऊस पडण्याची शक्यता नसून, सध्या केवळ वारेच वाहणार आहेत. २२ ते २३ जूननंतर मात्र मराठवाडा व विदर्भात पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे २५ जूननंतर सर्वत्र चांगल्या पावसाला शक्यता आहे, असेही औंधकर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

निम्मा जून महिना संपला, तरी पाऊस नसल्याची स्थिती संपूर्ण राज्यात आहे. हीच स्थिती पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, जून महिन्याचा शेवटचा आठवडा हा पावसाचाच असेल आणि या पावसाने जून महिन्याची बरीचशी तूट भरून निघेल, असाही अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *