ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे येथे “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन एन.बी.ए. क्रायटेरीया” या कार्यशाळेचे आयोजन

आज बुधवार, दि.२८.०४.२०२१ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज मौजे शेळवे ता.पंढरपूर येथे IQAC Cell या विभागाने “एन.बी.ए. क्रायटेरीया विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम” या कार्यशाळेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जेएसपीएम राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, ताथवडेचे प्राध्यापक डॉ.श्री.अजय पैठणे सर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे विश्वस्त मा.श्री.रोहन परिचारक यांनी भूषविले व यावेळी केईसी व केपीसी चे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील सर व डॉ.श्री.ए.बी.कणसे सर, ऑर्गनायझिंग कमिटीचे सदस्य व को-ऑर्डिनेटर्स उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे विश्वस्त श्री रोहन परिचारक यांचे हस्ते करण्यात आला. यांनी आपले मनोगत व्यक्त करत हा प्रोग्रॅम दि.२८.०४.२०२१ ते ३०.०४.२०२१ या कालावधीत होणार असल्यामुळे या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त शिक्षकांनी लाभ घ्यावा म्हणजे शिक्षकांसाठी एन.बी.ए. क्रायटेरीया काय आहे व त्याबद्दल आपण कुठे सुधारणा केली पाहिजे हे सर्वांनी जाणुन घ्यावे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील सर यांनी कॉलेज ची माहिती या कार्यशाळेच्या निमित्ताने करून दिली व नजिकच्या काळामध्ये NBA मूल्यांकन सुद्धा लवकरच प्राप्त होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. कर्मयोगी इंजीनिअरिंग कॉलेजची वाटचाल शैक्षणिक गुणवत्ता हा केंद्रबिंदू मानून होत असून NAAC मूल्यांकन नंतर NBAमूल्यांकन प्राप्त करण्यास महाविद्यालयातील सर्व कर्मचारी प्रयत्न करत आहेत याच धर्तीवर मूल्यांकन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

प्राध्यापक अनिल बाबर यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांची ओळख करून दिली व उपप्राचार्य श्री जगदीश मुडेगावकर यांनी या कार्यशाळेच्या प्रयोजनाचा हेतू सविस्तरपणे मांडला. मूल्यांकनाच्या प्रक्रियेतील विविध पैलूवर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अजय पैठणे सर आपल्याला निश्चितच सखोल माहिती देतील असे यावेळी त्यांनी सांगितले.डॉ अजय पैठणे सर हे राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ताथवडे पुणे येथे प्राध्यापक या पदावर कार्यरत असून त्यांचा वेगवेगळ्या पदावर काम केल्याचा अनुभव, विषयातील सखोल अभ्यास, तसेच मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये वारंवार घेतलेला सहभाग याच्या पाठबळावर मूल्यांकन करण्याचा उद्देश, मूल्यांकनाचे फायदे मूल्यांकनाचे शिस्तबद्ध प्रक्रिया कशी राबवता येईल याबद्दल डॉ.अजय पैठणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. उर्वरीत विषयावरील मार्गदर्शन पुढील दोन दिवस होणार असुन सर्व शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांकडून करण्यात आले. या कार्यक्रमास रजिस्ट्रार श्री गणेश वाळके सर्व विभागांचे विभागप्रमुख, केईसीचे व केपीसी कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाचे प्रसारण गुगल मीट, फेसबूक, युटयुब च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाचे आभारप्रदर्शन प्रा. दीपक भोसले सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *