ताज्याघडामोडी

लोकडाऊनच्या काळात रोपळे येथील व्यक्तीने ”खरेदी” केली दोन लाखाची ”टोपी” !

लोकडाऊनच्या काळात रोपळे येथील व्यक्तीने ”खरेदी” केली दोन लाखाची ”टोपी” !

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल 

एकीकडे सामान्य कष्टकरी लॉकडाऊनमुळे हतबल झाले असून रोजची हातातोंडाची गाठ पडली तरी दिवस सुखाचा गेला अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.जवळ शिल्लक असलेली जमा पुंजी अतिशय काटकसरीने वापरून प्रपंच केला जात आहे मात्र असे असतानाही जगाच्या बाजारात एक मूर्ख शोधण्यास गेले तर शेकडो सापडतात असाच प्रकार पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे घडला असून २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा मेसेज आल्यानंतर २५ लाख मिळणार या आशेने रोपळे येथील सिमेंट दुकान चालक संभाजी शिवाजी पवार यांनी २५ लाख मिळणार या आशेने जवळपास २ लाख रुपये सदर मेसेज पाठविणाऱ्या लोकांच्या विविध बँक अकाउंटवर पाठवून देखील २५ लाख रुपये रक्कम मिळाली नाही उलट आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
     विशेष बाब म्हणजे सदर फसवणूक झालेली व्यक्ती हि व्यवसायिक आहे.अशा प्रकारच्या कुठल्याही बोगस मेसेजला उत्तर देऊ नका,ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नका असे पोलीस प्रशासन वारंवार आवाहन करीत असताना या फिर्यादीने स्वतः जवळचे तसेच आपल्या मित्रमंडळींकडून उसनवारी करून जवळपास २ लाख इतकी रक्कम अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर २५ लाखाच्या आशेने ऑनलाईन पाठविली आहे.देशात अशा प्रकारे टोपी ”खरेदी” करणाऱ्याची संख्या भरपूर असल्यामुळेच ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याची मात्र चंगळ होत असून त्याचा त्रास मात्र पोलीस प्रशासनास सहन करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *