ताज्याघडामोडी

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष ‘या’ दिवशी ठरणार

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्याच्या घडीला सारं काही आलबेल नाही. कारण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपादाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय.

अनेक कार्यकर्त्यांकडून त्यासाठी आंदोलनही केलं जात आहे. कार्यकर्त्यांचा हट्ट पाहता शरद पवार यांनी दोन दिवसांचा कालावधी मागितला आहे. शरद पवार दोन दिवस याबाबत विचार करणार आहेत. त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती समोर आलेली. पण आता खूप मोठी बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असणार? याबाबत 5 मे ला बैठक होणार आहे. शरद पवार यांनी जाहीर केलेल्या निवड समितीची 5 मे ला बैठक होईल. या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. विशेष म्हणजे निवड समितिची 6 मे ला बैठक होणार होती. पण ही बैठक शरद पवार यांनी 5 मे ला घेतली आहे. निवड समितीची बैठक जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असं शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच कार्यकर्ते आणि नेते यांना विश्वासात घेऊन याबाबतचा निर्णय जाहीर करायला हवं होतं हे मला जाणवत आहे, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. पण विचारुन राजीनामाची घोषणा केली तर विरोध झाला असता, असंही शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांची राजीनाम्यानंतरची भूमिका समोर आली आहे. पवारांनी एक खंत व्यक्त केली. “६ मेची बैठक ५ मेलाच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. मी वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं, असं मला आता जाणवत आहे”, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. “जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला “, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *