राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १४७ पैकी ९४ ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. दुपारी २ वाजेपर्यंतच्या निकालानुसार, त्यामध्ये मविआ ५५ तर भाजप आणि शिवसेनेचे ३० ठिकाणी वर्चस्व दिसून येत आहे. यामध्ये भाजप २५ तर शिवसेना ७ ठिकाणी बाजी मारत आहे. राष्ट्रवादीने २७ ठिकाणी तर काँग्रेसने २२ ठिकाणी विजय मिळवला आहे. ठाकरे गटाचा ६ तर इतर गटांचे ९ ठिकाणी विजय झाले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी 18 ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याचे आधीच स्पष्ट झालेले आहे. 147 बाजार समित्यांसाठी नुकतेच मतदान पार पडले आहे. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी ही आज होतेय. अनेक बाजार समित्यांचे निकालही आता समोर आले आहेत.