ताज्याघडामोडी

‘कर्मयोगी’ मधील राज्यस्तरीय तंत्रपरिषदेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

“कर्माटेक 2K23” चे शानदार उद्घाटन, अनेक समजाभिमुख प्रकल्पांचे सादरीकरण.

विद्यार्थ्यानी अभियांत्रिकीचे ज्ञान व बदलते तंत्राद्यान यांची योग्य सांगड घालून समजाभिमुख संशोधन करावे. केवळ चाकोरीबद्द अभ्यास न करता आपल्यामधील कमतरतेला आव्हान देऊन ज्ञान संपादन करावे. कर्मयोगीच्या “कर्माटेक 2K23” या तंत्रपरिषदेतून मोठ्या प्रकल्पांची निर्मिती होऊन नवीन शोध जन्माला येतील असा विश्वास इलेक्ट्रोड्राईव्ह पॉवर ट्रेन सोल्यूशन प्रा. लि. चे मानव संसाधन प्रमुख (एचआर) श्री. राजीव यादव यांनी व्यक्त केला. २९ एप्रिल २०२३ रोजी कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) शेळवे पंढरपूर मध्ये आयोजित केलेल्या “कर्माटेक 2K23” या राज्यस्तरीय तंत्र परिषेदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून महाविद्यालयाची ओळख करून देऊन स्पर्धेमधील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलताना श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक म्हणाले की विद्यार्थ्यानी केवळ परीक्षेमद्धे गुण मिळविण्यासाठी ज्ञान संपादन न करता चौकस बुद्धिमत्ता ठेऊन ज्ञान मिळवावे. तसेच विद्यार्थ्यानी संशोधनवृत्ती विकसीत करून एक अभियंता म्हणून सर्वसामान्य जनतेचे जीवन अधिक सुखकर कसे होईल या दृष्टीने संशोधन करावे. एक यशस्वी अभियंता निर्माण होण्यासाठी कर्मयोगीमधील सर्व प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना सदैव मार्गदर्शन लाभेल अशी ग्वाही ही त्यांनी याप्रसंगी दिली.

कर्माटेक 2K23 तंत्रपरिषदेचे संयोजक प्रा. अनिल बाबर यांनी प्रस्तावना करून “कर्माटेक 2K23” कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील उद्देश सांगितला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख प्रा. मोहासिन शेख यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

सदर च्या परिषदेमध्ये मध्ये अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, मोडेल मेकिंग, इलेक्ट्रॉनिक्स क्वीज, प्रोजेक्ट एक्सिबीशन, ब्लाईंड सी, सर्किट सुडोकू अश्या विविध राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यातील पाचशे हून अधिक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना सुमारे वीस हजारहून अधिक रुपयाची बक्षिसे विजेत्यांना प्रदान करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भविष्यामद्धे ही कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये असे अनेक उपक्रम राबविले जातील अशी ग्वाही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी दिली. कार्यक्रमासाठी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार जी डी वाळके, उप पप्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. संयोजक प्रा. अनिल बाबर, सह संयोजक प्रा. अमरजीत देवकर, विभागप्रमुख प्रा. प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक वर्ग यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यामागे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन भक्ति जाधव व अथर्व रोकडे या विद्यार्थ्यानी केले. उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *