ताज्याघडामोडी

देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूर दौऱ्याची जोरदार चर्चा

देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूर दौऱ्याची जोरदार चर्चा

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस याचे निकटवर्ती व मूळचे पंढरपूरचे असलेले परंतु मंत्रालयात मोठा दबदबा असलेले राजु खरे यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस हे गोपाळपूर येथील श्री खरे यांच्या शेतात जीर्णोद्धाराचे काम सुरु असलेल्या नरसिह मंदिराच्या भूमिपूजनासाठी येणार असल्याची माहिती दिली होती.त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूर संभाव्य पंढरपूर दौऱ्याबाबत विविध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि सामान्य नागिरकांमध्येही जोरदार चर्चा होताना दिसून आली.त्याच प्रमाणे याची प्रशासकीय पातळीवर देखील चर्चा होताना दिसून आली. 
   राजू खरे हे वरिष्ठ राजकीय वर्तुळात एक मोठे प्रस्थ म्हणून वावरले जाते.उत्तर नागपूरचे दोन वेळा आमदार तर चार वेळा नगरसेवक राहिलेले आमदार डॉ.मिलिंद माने हे राजू खरे यांचे सख्खे मावसभाऊ आहेत तर बांधकाम विभागाचे राज्य सचिव  अनिलकुमार गायकवाड व माजी खासदार सुनील गायकवाड यांचे राजू खरे हे सख्खे मेहुणे आहेत.त्यांचा राज्यातील वरिष्ठ राजकीय वर्तुळात असलेला दबदबा पाहता देवेंद्र फडणवीस येणार असल्याबाबत चर्चेला मोठे बळ मिळाले आहे.   
        या बाबत राजू खरे यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नरसिह हे कुलदैवत आहे आणि माझ्या शेतजमिनीतील नरसिह मंदिर हे अतिशय पुरातन आहे.या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मी संकल्प केला तेव्हाच या मंदिराच्या कळसारोहण सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना आग्रह त्यांनी केला होता.व कितीही व्यस्त असले  तरी ते वेळात वेळ काढून नक्की येतील असा आत्मविश्वास राजू खरे यांनी व्यक्त केला आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सुविध्य पत्नी अमृता फडणवीस व आ.डॉ.मिलिंद माने यांच्या पत्नी डॉ. सरिता माने यांनाही सदर कलशारोहण समारंभासाठी आपण विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *