ताज्याघडामोडी

कर्मयोगी अभियांत्रिकीच्या रुद्राक्ष चे योग स्पर्धेत यश

तंत्रज्ञाना बरोबर च योगा चे ही मूल्य जपतेय कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय.

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणारे अंतर्गत घेण्यात आलेल्याआंतर महाविद्यालायीन योग स्पर्ध्येमध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे चा रुद्राक्ष बिराजदार याने तंत्रशुद्ध पध्दतीने सर्व आसने करून प्रथम क्रमांक पटकावला. सदर ची स्पर्धा SVKM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे येथे घेण्यात आली होती. या यशामुळे रुद्राक्ष ची कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल टेक्नॉलॉजी, भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेस डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी च्या संघात निवड झाली आहे. सदरील स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यातून रुद्राक्ष याची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. रुद्राक्ष हा कर्मयोगी च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग या विभागात द्वितीय वर्षात शिकत आहे.
या यश बद्दल संस्थेचे चेअरमन रोहन परिचारक, प्राचार्य डॉ एस.पी.पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ ए. बी कणसे, रजिस्ट्रार श्री जी .डी वाळके, उपप्राचार्य प्रा जगदिश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशिष जोशी, विभागप्रमुख प्रा धनंजय शिवपुजे, प्रा राहुल पांचाळ, प्रा अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, शारीरिक शिक्षण संचालक प्रा गणेश बागल तसेच सर्व प्राध्यापकांनी रुद्राक्षचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *