ताज्याघडामोडी

चिंचोली भोसे येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर करकंब पोलिसांची कारवाई 

चिंचोली भोसे येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर करकंब पोलिसांची कारवाई

अवैध वाळू उपसा प्रकरणातील आरोपीच्या बुलेट,तीन ट्रॅक्टरसह १० लाख २१ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

पंढरपूर शहरानजीक असलेल्या चिंचोली भोसे येथून सातत्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचे वेळोवेळी करण्यात आलेल्या कारवाईत उघड झाले आहे.अशातच जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने नुकतीच चिंचोली भोसेच्या पैलतीरावर असलेल्या इसबावी येथे मोठी कारवाई करत ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यात मोठी चर्चा झाली होती व स्थानिक पोलीस प्रशासन कारवाईत कुठे कमी पडतेय कि काय असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता.मात्र गेल्या दोन दिवसात पुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन अलर्ट झाले असल्याचे दिसून येत आहे.
करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार पुर्वनसन टाकळी येथे अवैध वाळुचे डंपिग ट्रक्टर येणार आहेत त्यावर कारवाई करा अशा सूचना देण्यात आल्या. यानुसार पोलीस कॉन्स्टेबल /दयानंद हजारे, पोलिस हवालदार शिंदे,पोलीस कॉन्स्टेबल भोसले, पोलीस कॉन्स्टेबल लेंगरे व पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड यांनी भाग घेतला.
या प्रकरणी सुनिल दत्तात्रय मेटकरी,अजित लहु पवार, ऋशिकेष विकास नवगिरे, अनिल लक्ष्मण पवार,माऊली त्रिंबक वायदंडे यांनी बेकायदेशिर बिगर पासपरमिटने भिमा नदी पात्रातुन अवैद्य रित्या वाळु उत्खनन करून चोरून घेवुन जात असताना मिळुन आले म्हणुन त्यांच्या विरोधात भा.द.वि. कलम 379,34 सह गौण खनिज सुधारीत अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *