ताज्याघडामोडी

१४ वर्षांच्या मुलानं नाणे गिळले, पण ४० सेकंदात असा जीव वाचवला

साधारणता पाच वर्षापर्यंत मुलं खेळण्यातील वस्तू किंवा पैशांचे नाणे यासारख्या गोष्टी तोंडात टाकतात. अशावेळी लहान मुलांवर डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवावे लागते. अनेकदा अशा घटना जीवावर उठतात अशी अनेक उदाहरण आपण पाहतो. बुलढाण्यात एका १४ वर्षीय मुलाने नाणे गिळल्याची घटना घडली आहे. शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथे ही घटना घडली आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथील १४ वर्षीय मंगेश इंदोरे या मुलाने सहज म्हणून १० रुपयांचे नाणे तोंडात ठेवले होते. अचानक ते नाणे त्याच्या घशात गेले आणि अडकले. घशात १० रुपयांचे नाणे अडकल्याने कुटुंबीयांची एकच धावपळ सुरू झाली. मुलाला अधिक त्रास होत असल्यामुळे वडिलांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर काही मिनिटांतच त्याच्या घशात अडकलेला कॉईन त्यांनी काढला. त्यामुळं पुढील अनर्थ टळला आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथील १४ वर्षीय मंगेश इंदोरे या मुलाने सहज म्हणून १० रुपयाचे नाणे तोंडात ठेवले होते. अचानक ते नाणे त्याच्या घशात गेले, त्यामुळे त्याच्या घशात वेदना व्हायला लागल्या आणि श्वास घेण्यास ही त्याला त्रास होऊ लागला. त्याने याबाबत वडिलांना सांगितले, त्यानंतर वडिलांनी तत्काळ त्याला शेगांव येथील बालरोगतज्ज्ञ डॉ सचिन सांगळे यांच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर सांगळे यांनी एक्स रे काढून नाणे अडकल्याची जागा निश्चित केली. त्यानंतर डॉक्टर सांगळे यांनी फोलिज कॅथेटरच्या मदतीने अवघ्या ४० सेकंदात या मुलाला कुठलाही त्रास न होऊ देता विनाशस्त्रक्रिया अन्ननलिकेत अडकलेले नाणे बाहेर काढले आणि मुलाला जीवदान दिले. त्यानंतर उपस्थित सगळ्यांनी डॉक्टरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *