ताज्याघडामोडी

खूशखबर! ‘इतक्या’ लाखांच्या पगारावर Income Tax नाही?

केंद्रीय अर्थसंकल्प म्हटलं की Income Tax वर चर्चा हमखास रंगते. प्रत्येक नोकरदाराला, वेतनदाराला याविषयीची उत्सुकता असते. अर्थात कर सवलत मर्यादा वाढविण्याची मागणी जोरकसपणे करण्यात येत आहे.

तुमच्या कमाईवर प्राप्तिकर द्यावा लागतो. पण कर रचना, इनकम टॅक्स स्लॅब त्याहून वेगळी असते. उत्पन्नानुसार कराची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार कर द्यावा लागतो. त्यातच उद्या (1 फेब्रुवारी 2023) नवीन अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यंदा नेमक्या कोणत्या घोषणा होणार आणि वर्षभर त्याचा आपल्या आर्थिक गणितांवर काय परिणाम होणार हेच जाणून घेण्यासाठी आता प्रत्येकजण उत्सुक आहे. 

उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारीला देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासाठीचं संसदेचे अर्थसंकल्प 2023 अधिवेशन आज (31 जानेवारी) सकाळी 11 वाजता सुरू होणार असून, ते 6 एप्रिलपर्यंत सुरु असेल. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून नोकरदार वर्गाला अनेक अपेक्षा आहेत. मोदी सरकारकडून किमान यंदाच्या वर्षी करामध्ये सवलत मिळण्याच्या अपेक्षा सध्या वेतनश्रेणीमध्ये येणाऱ्या वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *