ताज्याघडामोडी

‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाने जोर धरलेला आहे. राज्यातील राजकीय वातावरण जरी तापलेले असले तरी होणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी गारवा पसरलेला आहे. परंतु अद्यापही राज्यातील काही जिल्हे असे आहेत, ज्या ठिकाणी पावसाचा एक थेंबही पडलेला नाही.

ज्यामुळे त्या ठिकाणचा शेतकरी हा चिंतेत सापडलेला आहे. पण असे असताना आता हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये मुंबईसह उपनगरात आणि ठाणे, नवी मुंबई परिसरात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलेले आहे.

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यात आज (ता. 08 जुलै) काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यासह हवामान विभागाने कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पालघर जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. विदर्भामध्ये देखील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यासोबतच आता सातारा आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *