ताज्याघडामोडी

घरावर दरोडा टाकला, वृद्ध महिलेला संपवले; ९६ तासांचे सीसीटीव्ही पाहिले अन् गूढ समोर आलेच

देगलूर येथे दरोडा टाकून घरातील चार लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. यावेळी वृद्ध दाम्पत्याचे दोरीने हातपाय बांधून महिलेची हत्या करण्यात आली. ही २३ जानेवारी रोजी घडली होती. या घटनेचा उलगडा झाला असून याप्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

उदगीर रस्त्यावरील शास्त्रीनगरमध्ये श्रीपतराव रामजी पाटील यांच्या घरावर दरोडा पडल्याची घटना घडली. यावेळी त्यांची पत्नी चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील यांचे पाय व तोंड कपडयाने बांधुन त्यांचा खून करण्यात आला. चोरटयांनी सोन्या चांदीचे ३ लाख ८९ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी देगलूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्‍ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांची टीम व स्थागुशा, मुखेड, मरखेल, मुक्रामाबाद पोलीसांचे शोध पथक तयार करण्यात आले होते.

कर्नाटक राज्यातील वडगाव औराद, संतपुर येथील जवळपास ९६ तासांचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक बाबीचे विश्लेषण केले. या पथकांना पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, पोलीस उपनिरिक्षक दळवी, ओढणे, सिटीकर, सायबर पोलीस स्टेशन यांनी महत्त्वपुर्ण तांत्रीक सहाय पुरविले रवि मुंढे मोरे, व पोलीस नाईक सुनिल पत्रे, यांना मिळालेल्या गोपनिय माहिती अधारे सीसीटीव्ही मधील आरोपींची ओळख पटवुन गुन्ह्यात सहभागी असणारे गुन्हेगार निष्पन्न केले आहे.

मृत चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील यांच्याबाबत त्यांचा भाचा शहाजी मरतळे यांने अन्य आरोपींना माहिती दिली. त्यानंतर आरोपींनी कट करून गुन्ह्याचे नियोजन करून घराची रेखी करून मृत चंद्रकलाबई श्रीपतराव पाटील यांचा खून करून त्यांच्या घरातील सोन्या- चांदीचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून घेवुन गेले असल्याचे कबुल केले आहे.

सदर गुन्हयात आरोपी विठठवल व्यंकट बोईनवाड (रा वसुर ता. मुखेड), बालाजी पंढरी सोनकांबळे, (रा. मंग्याळ, ता. मुखेड), गौतम दशरथ शिंदे (रा. वसुर ता. मुखेड), शेषेराव माधवराव बोईनवाड (रा. वसुर ता. मुखेड) , शहाजी श्रीराम मोरतळे ( रा. मोरतळवाडी ता. उदगीर) यांना अटक करण्यात आली, असे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *