ताज्याघडामोडी

भीमाचा काटा चोख, वैधमापन विभागाच्या अचानक तपासणीत शिक्कामोर्तब

शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र.. भीमाचा काटा चोख हे समृद्धीचं सूत्र

वैधमापन विभागाच्या अचानक तपासणीत स्पष्ट

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या काट्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे. या विश्वासाला तडा जावू न देता आजच्या वजनकाटा तपासणीने विश्वासार्हता वाढली आहे. वैद्यमापन पथकाने कारखान्याकडील काट्याची तपासणी करत एकच वाहन तीन काट्यावर फिरवून वजन केले. त्यामध्ये किंचितही फरक आढळून आला नाही. यानंतर काट्यावर २० किलोची प्रमाणित वजने ठेवून प्रत्यक्ष वजन केले असता सुद्धा वजनात कोणताही फरक आढळून आला नाही. 

संपूर्ण राज्यात अनेक कारखान्यांकडून सर्रास काटा मारण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून केला जात आहे. राज्यात हे अनागोंदीच चित्र असताना भीमा कारखान्याची महाडिक यांच्याकडे सत्ता आल्यापासून आजवर एकाही सभासदाची काट्याबद्दल तक्रार आलेली नाही. महाडिक यांनी बाहेरील काट्यावर वजन करून आणण्यासाठी ऊस उत्पादकांना परवानगी दिली आहे. भीमाचा काटा चोख असून काट्यात एक किलोचा जरी फरक आढळला तर एक लाख रुपयांचं बक्षीस महाडिक यांनी जाहीर केलं होत. काटा मारीमुळे होणारे नुकसान समजल्याने गेल्यावर्षी इतर कारखान्याला ऊस घालणारे शेतकरी सुद्धा यावर्षी ‘माझा ऊस भीमालाच’ असं म्हणत आहेत.

कारखान्यात क्लिनिंग प्रक्रियेसाठी मिठाची आवश्यकता असते. मीठ पुरवणाऱ्या ठेकेदाराने बाहेरील काट्यावर वजन करून आणलेल्या मिठाचे कारखान्याच्या काट्यावर वजन केले. काहीतरी फरक आढळेल या आशंकेने आलेल्या ठेकेदाराला दोन्ही ठिकाणी केलेल्या वजनात काहीच फरक आढळला नाही. त्यामुळे फक्त शेतकरी सभासदांचाच नाही तर पुरवठा ठेकेदारांचा सुद्धा काट्याबद्दल विश्वास वाढला आहे. 

वैद्यमापन तपासणी पथकामध्ये पुरवठा निरीक्षक पी. एच. मगर, उप नियंत्रक अ. ध. गेटमे , लेखापरिक्षक एन. डी. माडे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी राजाराम मुरलीधर डोंगरे उपस्थित होते. तपासणी वेळी कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, व्हाईस चेअरमन सतिश जगताप यांच्यासह संचालक, सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

‘भीमाचा काटा चोख आहे’ हा सभासदांचा विश्वास आजच्या काटा तपासणीने पुन्हा एकदा सिध्द झाला आहे. कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हिताला प्राधान्य दिले आहे. भीमा कारखान्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये चोख काटा असणारा कारखाना म्हणून नाव लौकीक मिळविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *