ताज्याघडामोडी

गादेगांवचे यशवंतराव दत्तात्रय यादव यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई विद्यापिठाची पी.एच.डी. प्राप्त

गादेगांवचे यशवंतराव दत्तात्रय यादव यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई विद्यापिठाची पी.एच.डी. प्राप्त

पंढरपूर – गादेगांवचे यशवंतराव दत्तात्रय यादव यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था (Tata Institute of Social Sciences-TISS/टीस), मुंबई या नामवंत विद्यापिठाची पी.एच.डी. (डॉक्टरेट) मिळाली आहे.
शनिवारी (१९ डिसेंबर २०२०) मुंबई येथे झालेल्या पदवीदान समारंभामध्ये (Convocation) त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. कोविड-१९ उद्रेकामुळे हा पदवीदान समारंभ ऑनलाईन (र्व्हच्युअल) घेण्यात आला.
‘माहिती तंत्रज्ञान (Information Technology-IT) आणि फळशेती: पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचा अभ्यास’ या विषयावरील प्रबंध (Thesis) त्यांनी टीस (TISS) विद्यापिठाच्या ग्रामीण विकास विभागाला सादर केला होता. यासाठी त्यांना टीस विद्यापिठातील प्रोफेसर डॉ. पी. गोपीनाथ यांचे मार्गदर्शन लाभले
यशवंतराव यादव हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय शामराव यादव (गुरुजी) यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामीण भागातून अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *