ताज्याघडामोडी

एक चान्स दे… दहावीच्या मुलीकडे वडिलांच्या मित्रानेच केली अश्लील मागणी

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर लक्ष ठेव, असे वडिलांनी मित्राला सांगितले होते. मात्र त्यानेच मित्राच्या मुलीवर वाईट नजर ठेवली. एक चान्स दे, अन्यथा तुझ्या वडिलांना तू मुलासोबत बोलते ते सांगून देईन, असे ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. शेवटी मुलीने दामिनी पथकाची मदत घेतली. सापळा रचत नराधमाचे मनसुबे उधळले. ही घटना शहरातील हर्सूल भगात समोर आली.

हर्सूल परिसरात राहणारी १६ वर्षांय राधिका (नाव बदललेले) दहावीच्या वर्गात शिक्षण घेते. तिचे वडील ड्रायव्हर आहेत. तर आई घरकाम करते. तिच्या वडिलांनी ३५ वर्षांच्या ड्रायव्हर मित्र असलेल्या सुहासला (नाव बदललेले) मुलीवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. सुहास हा रधिकाला, ‘तुझी ज्या मुलासोबत मैत्री आहे. त्याची माहिती तुझ्या वडिलांना सांगतो. सांगायचे नसेल तर मला भेटायला ये आणि एक चान्स दे,’ अशी मागणी तो करत होता. मागील काही दिवसांपासून त्याने तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्यामुळे तिने सुहासचा मोबाइल क्रमांकही ब्लॉक केला होता. या ब्लॅक मेलिंगला राधिका वैतागली होती. तिने या विरोधात पोलिसात जाण्याचे ठरविले. राधिकाने परिसरात राहणाऱ्या दामिनी पथकातील एका कर्मचाऱ्याची भेट घेतली आपबिती सांगितली. अशी या धक्कादायक घटने प्रकरणी अधिक माहिती समोर आली.

दामिनी पथकाच्या प्रमुख निरीक्षक आम्रपाली तायडे यांच्या सूचनेनुसार पोलिस हवालदार लता जाधव, महिला पोलिस नाईक कल्पना खरात, सुजाता खरात, चालक बनसोडे यांनी राधिकाची हर्सूल परिसरात भेट घेतली. तसेच सुहासला फोन करून भेटण्यास बोलाविण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान सुहासने सायंकाळी हर्सूल परिसरातील त्याच्या गाडीतच राधिकाला भेटायला बोलावले. त्यानुसार दामिनी पथकाने सपळा रचला आणि त्याला पकडून भरोसा सेल येथे आणले. भरोसा सेल येथे निरीक्षक तायडे यांनी राधिकाची आई व सुहासच्या पत्नीला बोलावून घेतले. तेव्हा दोघींचाही सुहासवर विश्वासच बसेना. त्याने केलेल्या कृत्याची कबुली सर्वांसमोर दिली. तेव्हा दोघींना धक्काच बसला. शेवटी मुलीच्या आईसह कोणीही तक्रार देण्यास नकार दिल्यामुळे सुहासला कायदेशीर कारवाई करीत सोडून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *