ताज्याघडामोडी

झाडाला दोरी बांधून प्रेमीयुगुलाची आत्महत्या

बदनामी असह्य झाल्याने घेतला निर्णय 

रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कालिदास स्मारक ते अंबाळा मार्गावरील झाडाला दोरी बांधून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

रंजना (बदललेले नाव ) ही विवाहित होती. तिला दोन मुले आहेत. काही महिन्यांपूर्वी रंजना व मयूरचे(बदललेले नाव ) प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर रंजना मुलांना सोडून मयूरसोबत रामटेक येथे गेली. तेथे दोघेही भाड्याने राहायला लागले. दरम्यान, रंजनाच्या पतीने ती बेपत्ता असल्याची तक्रार हिंगणा पोलिसांत दिली. पोलिसांनी ती बेपत्ता असल्याची नोंद केली. नातेवाइकांनी शोध घेतल्यानंतर ती रामटेक येथे मयुर याच्यासोबत राहत असल्याचे त्यांना आढळले. तेथे जात त्यांनी रंजनला परत आणले. मात्र, तिने पतीसोबत राहण्यास नकार दिला.

त्यानंतर ती पुन्हा निघून गेली आणि मयूरसोबत राहायला लागली. रंजना आणि मयुर यांच्या दरम्यान सुरू असलेला हा प्रकार गावकऱ्यांना समजला. काही दिवसातच लोक त्यांच्या विषयी चर्चा करू लागले. त्यांची गावात बदनामी झाली. हे रंजना आणि मयुर यांना समजले. बदनामीमुळे दिवसेंदिवस त्यांना राहणे असह्य होऊ लागले. त्यामुळे दोघांनी अगदी टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविण्याचे ठरविले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *