ताज्याघडामोडी

मद्यपी शिक्षकाचा संतापजनक प्रताप! झिंगलेले शिक्षक वर्ग खोलीतच झाले आडवे

मद्यपी शिक्षकाचा संतापजनक प्रताप पहायला मिळाला आहे.शिक्षकाने चक्क दारू पिऊन शाळेत हजेरी लावली. मद्याने झिंगलेले शिक्षक शाळेतील वर्ग खोलीत फरशीवर आडवे झाले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

वर्गातच लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार

विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकानेचं यथेच्छ मद्यप्राशन करून शाळेत प्रवेश केला. इतकंच नाही, तर त्यांनी वर्गातच लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिक्षकाच्या या प्रकाराने भयभीत विद्यार्थी पळत वर्गाबाहेर जात मुख्याध्यापक तथा पालकांना माहिती दिली. दरम्यान, मद्याने झिंगलेले शिक्षक शाळेतील वर्ग खोलीत फरशीवर आडवे झाले. हा सर्व प्रकार गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या निंबा येथील प्राथमिक पूर्व माध्यमिक शाळेत गुरुवारी घडला. आर. जी. मरस्कोल्हे असे मद्यधुंद शिक्षकाचे नाव आहे. यानंतर मद्यधुंद शिक्षकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून

मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकाचे नाव ए. जी. मरसकोल्हे आहे. ते शाळेच्या वेळेतच दारू पिऊन झिंगाट होऊन आले. आणि शाळेत मद्यधुंद अवस्थेत पडलेले दिसले. अनेकांनी त्यांचा व्हिडीओ देखील केला. या शिक्षकाला दारूची नशा इतकी चढली होती, की आपल्या आजूबाजूला काय होत आहे. याचे भान देखील या मद्यपी शिक्षकाला नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *