ताज्याघडामोडी

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “आविष्कार” उत्साहात संपन्न

स्पर्धेमध्ये ४३ महाविद्यालयांचा सहभाग, 

विजेत्या, उपविजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी तर्फे घेण्यात आलेल्या आविष्कार या झोनल लेव्हल टेक्निकल स्पर्धेत सुमारे ४३ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे पंढरपूर याठिकाणी ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. अँटलास कॉपको या कंपनी चे हेड श्री कबीर गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. 

संशोधन व नवनिर्मिती ला चालना देण्यासाठी डीबाटू तर्फे ही स्पर्धा घेण्यात येते. महाविद्यालय स्तरावरील विजेते विद्यार्थी या स्पर्धसाठी सहभागी झाले होते. 

दिपप्रज्वलाने स्पर्धेची सुरुवात झाली. प्रा. धनंजय शीवपूजे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, तसेच डॉ अभय उत्पात यांनी महाविद्यालयाची ओळख करून दिली. त्यानंतर प्रा. आशिष जोशी यांनी स्पर्धेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. डॉ एस पी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे पाहुणे कबीर गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहीत केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी चे डॉ रमेश काटे व प्रा. गोविंद जाधव यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. विविध विभागातील तज्ञ लोक या स्पर्धेला परीक्षक म्हणून उपस्थित होते. 

इंजिनिअरिंग, फार्मसी, आग्रिकल्चर, हॉटेल मॅनेजमेंट आदी विभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धमध्ये मॉडेल सादर केले. 

प्रत्येक विभागातील विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.

सदर च्या स्पर्धेला श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, कर्मयोगी पॉलीटेक्निक चे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके, उप प्राचार्य जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ अभय उत्पात, आविष्कार चे संयोजक प्रा. आशिष जोशी, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपुजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले तसेच सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *