ताज्याघडामोडी

विचारात सकारात्मकता असल्यास व्यक्ती प्रफुल्लित होतो -ब्रह्मकुमार पियुषभाई स्वेरीत ‘निसर्ग, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न

पंढरपूर- कोणतेही कार्य करताना चेहऱ्यावर हास्य ठेवणे आवश्यक आहे. चेहऱ्यावरील हास्यामुळे आपली कामे अधिक सहजपणे होतात तसेच कामाचा कितीही ताण-तणाव असू द्या परंतु जर मनाची एकाग्रता अभंग ठेवली तर हाती घेतलेले काम पूर्णत्वाकडे झुकते. कोणतेही काम करताना आपल्या चेहऱ्यावर उत्साह असावा तसेच विचारात सकारात्मकता ठेवल्यास व्यक्ती अजून प्रफुल्लित होतो.’ असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचे ब्रह्मकुमार पियुषभाई यांनी केले.

         गोपाळपूर ( ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या खुल्या रंगमंचावर निसर्गपर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर आयोजिलेल्या एक दिवशीय मार्गदर्शनसत्रामध्ये ब्रह्मकुमार पियुषभाई विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि त्यांची मानसिकता’ यावर मार्गदर्शन करत होते. महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘जीवनात उत्तम मार्गदर्शनाची गरज असते त्यामुळे आपले जीवन योग्य दिशेने जावून सुखकर होते. जीवनाच्या प्रवासात मार्गदर्शक गुरु आवश्यक आहेत जे सामान्य माणसांना योग्य दिशा देऊ शकतात. आपण प्रयत्न करणे जो पर्यंत सोडून देत नाही तोपर्यंत अपयश हे अपयश नसते. अशावेळी आपल्या मनाला मन:शांतीची आवश्यकता असते. ही मन:शांती आपले मार्गदर्शक उत्तमप्रकारे देवू शकतात.’ प्रेरणादायी मार्गदर्शिका ब्रह्मकुमारी अस्मिता बहेनजी म्हणाल्या की, ‘चांगले बोलाचांगले पहा व चांगले ऐका याचबरोबर चांगले विचार करणे‘ आवश्यक बनले आहे. यासाठी मोठी स्वप्ने पहात्यांचा पाठपुरावा करा म्हणजे आपण इच्छित ठिकाणी लवकर पोहोचू. यासाठी सर्वप्रथम आपल्या अंतरंगी समाधान ठेवणे गरजेचे आहे. जेवढ्या अपेक्षा वाढत आहेत तेवढे आपण दुःखाच्या खाईत लोटले जात आहोत. त्यामुळे कोणावरही अपेक्षेचे ओझे लादू नकाआपले जीवन सुखमय बनवा तसेच व्यक्तिगत आनंददायी जीवनातून विश्व शांति निर्माण करणे हा ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचा मुख्य उद्देश आहे.’ ब्रह्माकुमारी सोमप्रभा बहेनजी म्हणाल्या की, ‘मनुष्याच्या चारित्र्याची जडणघडण करणे तसेच कामक्रोधलोभमोहमद आणि मत्सर हे माणसात असलेले षडविकार कमी करणे आवश्यक आहे. स्वेरी मधील नियमित घेतले जाणारे प्राणायाम हे देखील एक प्रगतीचे मुख्य लक्षण आहे. कारण आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी प्राणायामाची गरज आहे.’ पुढे बोलताना ब्रह्मकुमार पियुषभाई म्हणाले की, ‘सूर्योदय होण्यापूर्वी जागे झाले पाहिजे कारण सकाळी सकारात्मक ऊर्जा अधिक असते. त्यामुळे महत्त्वाचे कार्य सकाळीच आटोपते घ्यावे. सूर्योदयानंतर जागे होणे म्हणजे सर्व कामे आपणहून रखडवणे. इतर लोकांना बोलण्यासाठी फोनची गरज असते मात्र स्वतःला बोलण्यासाठी मौनाची गरज आहे. आजकाल दुनियेमध्ये कुठे काय चालू आहे याची अचूक माहिती जाणून घेतो पण आपल्या अंतरंगात नेमके काय चालले आहेहे पाहण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही.’ असे सांगून ब्रह्मकुमार पियुषभाई यांनी लीडर’ आणि मॅनेजर’ यांतील फरक स्पष्ट केला. यावेळी विद्यार्थ्यांकडून प्रेरणादायी विविध प्रात्यक्षिके करून घेतली. ब्रह्मकुमार प्रतापभाई शिंदे यांनी प्रकृतीपर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन’ याविषयी प्रतिज्ञा दिली. यावेळी ब्रम्हकुमारी संगीता बहेनजीउज्वला बहेनजीगीता बहेनजीनीता बहेनजीमीरा बहेनजीलता बहेनजीकीर्ती बहेनजीदुर्गा बहेनजीजयश्री बहेनजीकांचन बहेनजीधनंजयभाईमस्केभाईचव्हाणभाईमोरेभाईउमेशभाई तसेच स्वेरीच्या बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियारडिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळडी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवेविद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपतीसांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रमुख डॉ. आर. एन. हरिदासस्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकीफार्मसीच्या पदवी व पदविका तसेच एमबीएएमसीए या पदव्युत्तर पदवीचे प्राध्यापक व  विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम वर्ष अभियांत्रिकेचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *