ताज्याघडामोडी

लाइफलाईन,गॅलॅक्सी,गणपती हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत बाकी हॉस्पिटल मधील आरक्षित बेड्चे काय ?  

लाइफलाईन,गॅलॅक्सी,गणपती हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यरत,बाकी हॉस्पिटल मधील आरक्षित बेड्चे काय ?

मेस्मा अंतर्गत कारवाई होणार ?  

जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अधीकृत वेबसाइटवरून पंढरपूर शहरातील कोरोना डेडिकेटड हॉस्पिटलवर प्रचंड ताण येत असल्याचे दिसून येत आहे.आज सकाळी १० वाजताच्या आकडेवारी नुसार लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये सर्वाधिक ७७ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत तर त्या खालोखाल उपजिल्हा रुग्णालय ५७,गॅलॅक्सी हॉस्पटिल ४९ तर गणपती हॉस्पिटल येथे ३८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
याच वेळी याच वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार वरील हॉस्पिटलशिवाय इतर काही हॉस्पिटलमधील बेडही कोरोना अधितांसाठी अधिग्रहित करण्यात आले आहेत.मात्र या ठिकाणी उपचार सुरु असलेल्या कोरोना रुग्णाची संख्या निरंक आहे.
दर दिवशी वाढत जाणारा आकडा पाहता या इतर हॉस्पिटलमधील अधिग्रहित खाटांचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे यासाठी तयारीत राहणे गरजेचे आहे.
यात आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे कोरोना रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध व्हावेत म्हणून खाजगी खाजगी हॉस्पिटलमधील ८० टक्के बेड अधिग्रहित करण्याचे आदेश शासनाने दिले होते त्यानुसार जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या वेबसाईटवरील आजच्या कोरोना रुग्णांसाठीच्या बेड उप्लब्धते बाबत देण्यात आलेल्या आकडेवारीत पंढरपुरातील नामांकित व प्रशस्त इमारत,आयसीयू सुविधा व ऑक्सिजन बेड सुविधा असलेल्या अपेक्स हॉस्पटिल मध्ये कोरोना रुग्णांसाठी राखीव असलेले सर्वच्या सर्व म्हणजे ३९ बेड हे गेल्या महिना भरापासून रिकामे असल्याचे दाखविण्यात येत आहे.या बाबत प्रशासनाकडून खुलाशाची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र सरकारने खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्सबाबत दरनिश्चिती केली आहे. तर इन्शुरन्स असलेल्या रुग्णांसाठी देखील इन्शुरन्स कंपनीने आखून दिल्याप्रमाणे पैसे आकारणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
सरकारने केलेली दरनिश्चिती (प्रतीदिन)
कोव्हिड बेड किंवा आयसोलेशन – ४००० रूपये
आयसीयू – ७५०० रूपये
व्हॅन्टीलेटर – ९००० रूपये
मात्र काही हॉस्पिटल चालक हे आमचा बराचसा स्टाफ काम सोडून गेला असल्याचे सांगत आहेत. या बाबत अधिक चौकशी होऊन कारवाई केली जाऊ शकते.
एरव्ही रुग्णाच्या सेवेसाठी ट्रेंड कमी अनट्रेन्ड स्टाफ जास्त असतानाही दिवसागणिक हजारो रुपये बिले आकरणारे काही हॉस्पिटल आज या संकटकाळात मात्र निवांत आहेत एवढे मात्र खरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *