वाशीमधील एका खाजगी क्लासमध्ये घरी दिलेला अभ्यास पूर्ण केला नाही म्हणून क्लासच्या शिक्षिकेने मुलाला इलेक्ट्रिक लायटरने चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वाशीच्या सेक्टर 3 मधील एका इमारतीत खाजगी क्लासमध्ये एक आठ वर्षीय मुलगा अनेक दिवसापासून जात होता. दरम्यान दोन दिवसापूर्वी संध्याकाळी तो क्लासमध्ये गेला असता त्याला संबधित शिक्षिकेने गृहपाठ केला की नाही म्हणून विचारणा केली.
मात्र त्याने केला नसल्याचे सांगितल्यावर शिक्षिकेने घरातील वापरला जाणाऱ्या इलेक्ट्रिक लायटरने हातावर चटके दिले. दरम्यान याबाबत मुलाने घरी आल्यावर पालकांना याबाबत माहिती दिली. याबाबतचे गांभीर्य पालकांच्या लक्षात येताच त्यांनी वाशी पोलीस ठाणे गाठले,आणि संबधित शिक्षीके विरोधात तक्रार दाखल केली. वाशी पोलिसांनी संबधीत महिला शिक्षीिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्या महिला शिक्षिकेने अजून कुठल्या मुलांसोबत असे कृत्य केले किंवा नाही त्याचा तपास करत आहेत.