ताज्याघडामोडी

डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या आजीने स्मशानभूमीत उघडले डोळे, मग पैपाहुण्यांची पळापळ सुरु

आतापर्यंत स्मशानभूमीत गेल्यानंतर अचानक मृत घोषित केलेली व्यक्ती जिवंत झाल्याचा किस्सा कोणाकडून तरी ऐकला असेल. परंतु उत्तर प्रदेशमध्ये एका आजीला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर ती चक्क स्मशानभूमीत जिवंत झाली आहे.

घटना नुकतीच फिरोजाबादमध्ये घडली आहे. नातेवाईक आजीला जाग आल्यानंतर घरी घेऊन गेल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे.

ही घटना फिरोजाबादमधील कस्बे बिलासपूरची आहे. तिथं राहणाऱ्या हरिभेजी या मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना चांगल्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु त्यांचा मेंदू निकामी झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर नातेवाईकांनी अंतिम संस्कार करण्याची तयारी सुध्दा केली.

अंतिमविधी घरात झाल्यानंतर आजीला स्मशान भूमीत आणण्यात आलं, परंतु तिथं आल्यानंतर आजीने अचानक डोळे उघडल्याने नातेवाईकांची पळापळ झाली. कारण डॉक्टरांनी मृत घोषित केलेली आजी अचानक जिवंत झाल्याने अनेकांना धक्का बसला. त्यानंतर आजीला नातेवाईकांनी तात्काळ घरी नेले.

आजीला नातेवाईकांनी घरी नेल्यानंतर पाणी आणि चहा सुद्धा पाजला. आजीची तब्येत अत्यंत नाजूक होती, परंतु तिचा मृत्यू नव्हता झाला. दुसऱ्या दिवशी हरिभेजी या आजीचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *