ताज्याघडामोडी

आताची मोठी बातमी! देशात पुन्हा एकदा नोटबंदी? 2 हजारांची नोट बंद होणार?

500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आणल्यानंतर आता 2000 रुपयांची नोट बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांचा गुन्हेगारी कारवाया आणि बेकायदेशीर व्यापारात मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचा आरोप करत 2 हजार रुपयांच्या नोटेवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी सभागृहात शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला.

‘गेल्या काही दिवसांपासून बाजारात गुलाबी रंगाच्या 2,000 रुपयांच्या नोटा दुर्मिळ झाल्या आहेत. एटीएममधूनही 2 हजार रुपयांची नोट मिळत नाही, त्यामुळे 2 हजार रुपयांची नोट आता वैध नाही अशी अफवा पसरवली जात आहे. सरकारने या संदर्भात परिस्थिती स्पष्ट करण्याची करावी अशी मागणी सुशील मोदी यांनी केली आहे. 

2016 मध्यो झाली होती नोटबंदी

8 नोव्हंबर 2016 रोजी केंद्र सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. याअंतर्गत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा अवैध घोषीत करत चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. या नोटांच्या बदल्यात सरकारने 500 च्या नविन आणि 2000 हजार रुपयांची नोट बाजारात चलनात आणली. पण भाजप खासदार मोदी यांनी केलेल्या दाव्यानुसार गेल्या वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 हजार रुपायांच्या नोटेची छपाई बंद केली आहे.

तसंच 2 हजारांच्या नकली नोटाही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल्या आहेत. लोकांनी मोठ्या प्रमाणावर 2 हजाराच्या नोटांचा साठा केला आहे. त्याचा वापर केवळ अवैध धंद्यात होत आहे. काही ठिकाणी 2 हजारांच्या नोटा ब्लँकने विकल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *