ताज्याघडामोडी

अरे हा तर… लग्नघटिका समीप असताना मंडपवाल्यानं नवऱ्याला ओळखलं; कुटुंब ‘सावधान’ झालं अन्…

झारखंडच्या बोकारोमध्ये लग्नाच्या आधी नवरदेवाचं पितळ उघडं पडलं. नवरदेव हिंदू नसून मुस्लिम असल्याचं समजताच मुलीकडच्यांच्या पायाखालची जमीन सरकली. नवरदेव स्वत:ची ओळख पोलीस कर्मचारी म्हणून करून द्यायचा. मात्र नवरदेव तुरुंगात जाऊन आला होता. ५० वर्षांच्या अस्लमनं अल्पवयीन हिंदू मुलीसोबत तिच्यासोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अस्लमनं मुलीच्या कुटुंबाची फसवणूक केली. सध्या आरोपी फरार आहे. त्याच्या कारमधून पोलिसांचा गणवेशदेखील मिळाला.

बोकारोमधील हरला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. गुरुवारी, ८ डिसेंबरच्या रात्री अस्लमचा विवाह होणार होता. आरोपी वरात घेऊन अल्पवयीन तरुणीच्या घरी पोहोचला. गळ्यात हार घातल्यानंतर अस्लमचं भांडं फुटलं. यानंतर उपस्थितांनी नवरदेवाला चोप दिला. त्याला धरुन ठेवलं आणि पोलिसांना बोलावलं. मात्र त्याआधीच अस्लमनं धूम ठोकली.

हरलातील सेक्टर ९ मधील कुमहारटोली परिसरात लग्न सोहळा होऊ घातला होता. आरोपी अस्लम ५० वर्षांचा असून तो धनबादमधील वासेपूरचा रहिवासी आहे. देना बँकमध्ये कर्जासाठी गेले असताना मुलीच्या वडिलांची अस्लमशी ओळख झाली. त्यावेळी अस्लमनं स्वत:ची ओळख संजय कसेरा अशी करून दिली. कर्ज प्रक्रियेत मदत करण्याच्या बहाण्यानं अस्लम मुलीच्या घरी ये-जा करू लागला.

अस्लमनं स्वत:चं नाव संजय असल्याचं सांगितलं. आपण पोलीस असून लाटेहारमध्ये ड्युटीवर असतो, अशी बतावणी केल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी दिली. तुला चांगलं भविष्य देईन असं सांगत त्यानं मुलीवर लग्नासाठी दबाव आणला. कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यानं लग्नासाठी तयार झाल्याचं मुलीच्या वडिलांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *