गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गोपाळपूर गावचे उपसरपंच, सदस्य व इतर वाळूतस्करांना उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर कार्यालय यांच्याकडून जोरदार दणका…

मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम यांनी सोलापुर ग्रा घटकातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्षन करुन सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक श्री अतुल झेंडे साहेब व पंढरपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रम कदम साहेब यांचे मार्गदर्षनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर अवैध धंद्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे

आज दि 20/05/2021 रोजी पहाटे उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग यांनी त्यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांचेकडील पथकाने गोपाळपूर गावात चालू असलेल्या चोरून वाळू चोरीवर कारवाई केली.सदर छाप्या मध्ये 2 पिकअप, 2 किंमती मोटारसायकल, 1 वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी बैलगाडी असा एकूण 8,46,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदची वाळूचोरीबाबत गोपाळपूर गावचे उपसरपंच विक्रम आसबे, तसेच ग्रामपंचायत सदस्य उदय पवार तसेच गोपाळपूर गावातील स्वप्नील आसबे, सागर चव्हाण, पप्पू कोले, सागर घंटे, दीपक घंटे व इतर तीन जण असे एकूण दहा जनाविरुद्ध पोलीस शिपाई हुलजंती नेम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर उपविभाग यांच्या फिर्यादिवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी उपसरपंच विक्रम आसबे यास वाळूतस्करी मधेच तडीपार करण्यात आले होते, गुन्ह्याचा पुढील तपास पोनि किरण अवचर यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन वसमळे, पंढरपूर तालुका हे करीत आहेत.

 सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षिक तेजस्वीनी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधिक्षक मा अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम साहेब पंढरपुर उपविभाग यांचे मार्गदर्षनाखाली सपोनि आदिनाथ खरात, सपोनि शंकर ओलेकर, पोलिस नाईक श्रीराम ताटे , पोलीस शिपाई देवेंद्र सुर्यवंषी, पोलीस शिपाई शिवशंकर हुलजंती, पोलीस शिपाई घाटगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *