औरंगाबाद येथून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ताजी असतानाच आता गंगापूर तालुक्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेवर बलात्कार करून तोच व्हिडिओ गावात व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. महिला गाईला गवत आणण्यासाठी शेतात गेली असता आरोपींनी ती एकटी असल्याचं पाहून महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच, मला तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवू दे असे म्हणू लागला. महिलेनं नकार देऊन, तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी भगवान सुकासे याने महिलेवर बळजबरीने बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे या घटनेचा त्यांनी व्हिडिओ देखील शूट केला.
घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगीतल्यास हा व्हिडिओ मी दुसऱ्यांना दाखवुन गावात बदनामी करेन अशी धमकी आरोपीने दिली. दरम्यान, पुन्हा एकदा आरोपी भगवान सुकासेने त्याचे साथिदार रामेश्वर अशोक सुकासे आणि अमरनाथ सुनिल सुकासे यांच्यासह महिलेवर दुसऱ्यांदा बलात्कार केला. यावेळीही त्यांनी घटनेचा त्यांनी व्हिडिओ शूट करून गावात व्हायरल केला. पीडित महिलेला तिचा भाव गंगापूर पोलीस ठाण्यात घेऊन गेला व या ठिकाणी तीनही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.