ताज्याघडामोडी

सिंहगड संस्थेवर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू- डाॅ. कैलाश करांडे

पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न 

पंढरपूर: प्रतिनिधी

२९ वर्षे सिंहगड संस्था शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असुन संस्थेने दैदीप्यमान वाटचाल केली असुन संस्थापक अध्यक्ष आदरणीय एम. एन. नवले सरांच्या मार्गदर्शनाखाली २०१० पासून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने १० वर्षात केलेले प्रगती म्हणजे पालक व विद्यार्थ्यांनी सिंहगड संस्थेवर दाखवलेला विश्वास आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण महाविद्यालयातून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शिक्षक सदैव तत्पर आहेत. या महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेऊन जात असताना भारताचा नागरीक व उत्कृष्ट इंजिनिअर म्हणून विद्यार्थी बाहेर पडतील. पालक व विद्यार्थ्यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज वर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या स्वागत सोहळा या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्येचे आराध्य दैवत सरस्वती पुजन व जवाहरलाल नेहरू यांचे प्रतिमेचे पुजन पंडित बाळासाहेब खुळपे व शोभा कदम, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर आदींच्या हस्ते पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

महाविद्यालयाच्या वतीने पालक प्रतिनिधी यांचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यादरम्यान प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी अभियांत्रिकीच्या शिक्षणातील बेसिक नाॅलेज, विद्यापीठाचा अभ्यासक्रम, महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या सराव परीक्षा याविषयी एलसीडी स्क्रीनद्वारे माहिती प्रा. अनिल निकम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.

 ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, प्लेसमेंट होणेसाठी ट्रेनिंग आवश्यक असते. प्लेसमेंटसाठी आवश्यक ट्रेनिंग तृतीय वर्षात शिक्षण घेत असतानाच महाविद्यालय विद्यार्थ्यांना देत असते. शैक्षणिक गुणवत्ता प्लेसमेंट होणेसाठी आवश्यक असते. प्रथम वर्ष अभियांत्रिकी पासुनच प्रोग्रॅमिंग ट्रेनिंग मोफत देण्यात येते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना सर्व विषयात चांगल्या गुण घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक असते. ज्या विद्यार्थ्यांकडे कौशल्य आहे अशा विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळते. महाविद्यालयात जापनीज भाषेचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. प्लेसमेंट होणेसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. प्लेसमेंटसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात देण्यात येते याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन डाॅ. समीर कटेकर यांनी केले.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. महाविद्यालयाने दिलेला अभ्यास हा वेळेत केल्यास यश निश्चित भेटते. स्वतःची गुणवत्ता वाढवायची असेल तर वेळीच अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. शिवाजी पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. संपत देशमुख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *