ताज्याघडामोडी

फॅबटेक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी साजरा केला अनोखा बालदिन

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे, संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअरकॉ लेजमध्ये शिक्षकांनी अनोख्या पद्धतीने बालदिन साजरा करून विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये बालदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे, पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील, एओ वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ.वनिता बाबर हे लाभले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पंडित जवाहरलालने हरू यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमांमध्ये प्रथम स्कूलच्या टीचर कुमारी मृणाल राऊत यांनी गणेश वंदना सादर केली.यानंतर कु. रेशमा तोडकर व श्री.निसार इनामदार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. स्कूलचे म्युझिक टीचर डॉ.अमोल रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली समूहगीत सादर केले.यानंतर प्रशालेतील श्री.शहनवाज मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी एक विनोदी प्रहसन सादर केले.

विद्यार्थ्यांनी त्या विनोदी नाटकाचा मनसोक्त आनंद लुटला. प्रशालेतील महिला शिक्षकांनी सुंदर नृत्य सादर केले, त्याचबरोबर प्रशालेतील शिक्षकांनी मिळून सुंदर रिमिक्स सादर केले.बालदिनानिमित्ताने फॅबटेक स्कूलने विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे, प्रशालेचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

बालदिन कार्यक्रमासाठी सुपरवाझर सौ. वनिता बाबर,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री समाधान खांडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री सतीश देवमारे यांनी केले.व कु.मृणाल राऊत यांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत रकर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *