गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रियकरासोबत कट रचून पत्नीने चिरला पतीचा गळा, 24 तासात पोलिसांनी असा लावला छडा

दशरथ नागनाथ नारायणकर या व्यक्तीचा खून 21 सप्टेंबर रोजी झाला होता. क्राईम ब्रँचने या खुनाचा छडा लावत 24 तासांत गुन्हा उघडकीस आणला आहे. 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता गुन्हे शाखेने याबाबत अधिकृत माहिती दिली. मयत दशरथ नारायणकर याची पत्नी अरुणा नारायणकर व तिचा प्रियकर बाबासो जालिंदर बाळशंकर या दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

या दोघांनी संगनमत करून, दशरथ नारायणकर याचा गळा चिरून हत्या केली असल्याची कबुली दिली आहे, अशी अधिकृत माहिती पोलिसांनी दिली आहे.गुन्हे शाखेचे एपीआय संजय क्षीरसागर, महाडिक, संदीप पाटील, महेश शिंदे, निळोफर तांबोळी, कृष्णात कोळी, राजू मुदगल, कुमार शेळके यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यास महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. अनैतिक संबंधातून किंवा विवाहबाह्य संबंधातून ही निर्घृण हत्या झाल्याची माहिती देण्यात आली.

मयत दशरथ नारायणकर हा मूळचा अक्कलकोट तालुक्यातील डोंबारजवळगे येथील रहिवासी होता. कामानिमित्त सोलापुरातील जुना विडी घरकुल येथील केकडे नगर येथे राहावयास होता. दशरथ नारायणकर हा लग्नानंतर काही वर्षे, डोंबारजवळगे (ता अक्कलकोट ) येथे राहावयास होता. यावेळी विवाहित अरुणा आणि बाबासो बाळशंकर या दोघांचे अनैतिक संबंध निर्माण झाले. ही बाब पती दशरथ नारायणकर याला कळताच त्याने विरोध केला होता. गाव सोडून सोलापुरात वास्तव्यास होता. या ठिकाणी देखील पती दशरथ घरी नसताना बाबासो अरुणाला भेटायला येत होता.

अरुणा आणि बाबासो बाळशंकर याने दशरथचा काटा काढण्यासाठी डाव रचला होता. त्यासाठी दोघांनी मिळून नायलॉनची दोरी, झोपेच्या गोळ्या, आणि चाकु खरेदी केले होते. व्हॉट्सॲप चॅटिंगद्वारे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. 21 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अरुणा आणि बाबासो बाळशंकर या दोघांनी मिळून दशरथ नारायणकर याची गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर मयताची पत्नी अरुणा हिने पोलिसांना माहिती दिली. माझ्या पतीला कोणीतरी अज्ञात इसमाने ठार केले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी अरुणा नारायणकर हिचा जबाब घेतला व तपास सुरू केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *