ताज्याघडामोडी

ऍड.गणेश पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

भोसे ता.पंढरपूरचे मा.सरपंच,विठ्ठल परिवाराचे नेते ऍडव्होकेट गणेश राजुबापु पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड करण्यात आली असून रयत शिक्षण संस्थचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहीचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.
       पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब होतकरू बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून रयत शिक्षण संस्थेची १९१९ मध्ये स्थापना केली.आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी बांधिलकी राखत या संस्थेचा महाराष्ट्रातील १६ तर कर्नाटकातील १ जिल्ह्यात विस्तार झाला आहे.आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत ठराव क्रमांक ९ नुसार ऍडव्होकेट गणेश पाटील यांची जनरल बॉडी मेंबर म्हणून निवड करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
       समाजाच्या सर्वागीण विकासासाठी ऍडव्होकेट गणेश पाटील यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांची सदस्यपदी निवड करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.ऍडव्होकेट गणेश पाटील यांच्या निवडीनंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.   
                        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *