गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बनावट दागिने गहाण ठेवून बँकेतून घेतले 2 कोटींचे कर्ज

बनावट दागिने गहाण ठेवून ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेला 2 कोटींचा गंडा घालणाऱ्या दांपत्याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दांपत्याने बनाटव दागिने बँकेकडे गहाण ठेवून 2 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तपासात समोर आले की, या घोटाळ्यात बँक मॅनेजर आणि गोल्ड व्हॅल्यूअरदेखील सामील होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये झालेल्या या घोटाळ्यातील पती-पत्नी फरार होते आणि त्यांना पकडण्यासाठी मागील चार वर्षांपासून एक पथक काम करत होते. बुधवारी पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिसांना हे दांपत्य गावात येणार असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी सापला रचुन आरोपी हेमंत उदावंत आणि त्याच्या पत्नीला अटक केली.

आरोपी हेमंतने पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्य, ड्रायव्हर, कर्मचारी आणि नातेवाईकाच्या नावे बँकेत अनेक खाते उघडले. यानंतर बँक मॅनेजर आणि गोल्ड व्हॅल्यूअरला सोबत घेऊन 5.6 किलो बनावट दागिने बँकेत गहाण ठेवून बँकेकडून दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतले. अशाप्रकार बँक मॅनेजरकडून उदावंत आणि त्याच्या साथीदारांना अनेकदा कर्ज देण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *