

एकीकडे राज्यात पोलीस कर्मचारी भर उन्हात बारा बारा तास जनतेचा कोरोना पासून बचाव व्हावा म्हणून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडत असतानाच व राज्यात कर्तव्य पार पाडताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागलेला असताना दुसरीकडे याच पोलीस खात्यात काही राक्षसी प्रवृत्ती या खात्याची प्रतिमा मलीन करताना दिसून येत आहेत.कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित सहकारी पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीवर पोलीस शिपायाने बलात्कार केल्याची तक्रार सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रवी मल्लिकार्जुन भालेकर असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव असून चावडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.शहर पोलीस दलातील एका पोलिसाला करोनाची बाधा झाली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचा गैरफायदा पोलिस मित्रांने घेतला .२३ मे च्या मध्यरात्री १२ वाजता पोलीस सहकाऱ्याची पत्नी घरी आहे हे पाहून अत्याचार केला असल्याची असल्याची तक्रार पीडित महिलेने केली आहे.