ताज्याघडामोडी

बायकोच्या भीतीने महिन्याभरापासून झाडावर मुक्काम; खाली उतरवण्यासाठी गावातील महिलांची पोलिसांत धाव

उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील कोपागंज भागातील बसरथपूर गावात राहणारा एक व्यक्ती सध्या त्याच्या परिसरातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यातही चर्चेत आहे. रामप्रवेश नावाचा व्यक्ती गेल्या एक महिन्यापासून 100 फूट उंच झाडावर राहत आहे.

त्याला कोणी समजवायला गेले की तो झाडावर ठेवलेल्या विटा आणि दगडांनी हल्ला करतो आणि लोक पळून जातात. मग राम प्रवेश कधीतरी हळू हळू खाली उतरतो, विटा आणि दगड गोळा करतो आणि नंतर पुन्हा झाडावर चढतो.

रामप्रवेशचे वडील विशुनराम सांगतात की, रामप्रवेशला त्याच्या पत्नीमुळे झाडावर राहावे लागत आहे. कारण त्याची पत्नी त्याला रोज मारते आणि भांडण करते. पत्नीच्या अशा वागण्याने रामप्रवेश इतका वैतागला की त्याने महिनाभरापासूनच झाडावरच मुक्काम ठोकला आहे.

त्यामुळे त्याचं खाणं पिणं झाडावरच सुरु आहे.कुटुंबातील सदस्य अन्न आणि पाणी दोरीने झाडाजवळ बांधून ठेवतात. त्यानंतर रामप्रवेश ते वर ओढून घेतो. तो रात्री कधीतरी झाडावरून खाली येतो आणि इतर विधी वगैरे करून पुन्हा झाडावर जातो असे गावकरी सांगतात.

रामप्रवेश झाडावर चढून बसल्याने गावातील लोक संतप्त झाले आहेत.गावकरी म्हणतात की रामप्रवेश झाडाच्या टोकावर बसून राहिल्याने त्यांच्या गोपनीयतेवर परिणाम होत आहे कारण ते झाड गावाच्या मध्यभागी आहे आणि तिथून प्रत्येकाच्या घराचे अंगण दिसते. त्यामुळे अनेक अनेक महिलांनी याबाबत तक्रारीही केल्या आहेत

दरम्यान, गावकऱ्यांनी रामप्रवेशाबाबत पोलिसांकडे तक्रारही केली होती पण रामप्रवेशला झाडावरून खाली उतरवण्यातही पोलिसही अपयशी ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *