सर्वसामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्यांची शिवसेनेने घेतली काळजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सुरक्षा साहित्याची भेट
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतः रस्त्यावर उतरून शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन जनतेकडून करून घेतात अशा प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या दॄष्टीने ऑस्ट्रेलिया स्थित हायजीन लॅब्ज ह्या कंपनीच्या निर्जंतुकीकरण साधनांचे वाटप करण्याची संकल्पना हर्षल प्रधान यांनी मांडली होती व ही जबाबदारी “आम्ही गिरगांवकर टीम” वर सोपविण्यात आली होती.याचाच एक भाग म्हणून पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जिल्हाधिकारी सोलापूर मिलींद शंभरकर व पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते हे मंदिर भेटीकरीता आले असता त्यांना निर्जंतुकीकरण साधनांचे कीट शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती संभाजी शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी वेळी “आम्ही गिरगांवकर टीम”चे सदस्य गौरव सांगवेकर, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे साहेब,उपविभागीय अधिकारी पंढरपूर सचिन ढोले, मंदिरे समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी,उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर ,मंदिरे समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.