ताज्याघडामोडी

स्वेरी इंजिनिअरिंगचे हर्षवर्धन रोंगे यांना पीएच.डी.प्राप्त

 डॉ. हर्षवर्धन भीमराव रोंगे यांनी आय.आय.टी मुंबई या आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित असलेल्या संस्थेमधून नुकतीच पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांना आय.आय.टी. मुंबईच्या ६० व्या दीक्षांत समारंभामध्ये ही  पीएच.डी प्रदान करण्यात आली. त्यांचे आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून अनेक शोधनिबंध देखील प्रकाशित झाले आहेत.
         स्वेरी संस्थेचे विश्वस्त व स्वाईप संस्थेचे विश्वस्त व उपाध्यक्ष तसेच जलसंपदा विभागातील (महाराष्ट्र राज्य) निवृत्त उपविभागीय अभियंता भीमराव दाजी रोंगे यांचे ते चिरंजीव आहेत. आय.आय.टी.चे प्रोफेसर डॉ. श्रीप्रिया राममूर्ती व प्रोफेसर डॉ. शंकर कृष्णन यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली प्रा. हर्षवर्धन रोंगे यांनी पीएच.डी. पूर्ण केली. प्रा. डॉ.हर्षवर्धन रोंगे यांनी प्राथमिक शिक्षण पंढरपूर मधील आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये तर माध्यमिक शिक्षण द. ह. कवठेकर प्रशाला, पंढरपूर तसेच  बारावीपर्यंतचे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथून सायन्स विभागातून यशस्वीपणे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून पदवी पूर्ण केल्यानंतर देश पातळीवर घेतल्या जाणाऱ्या गेट परीक्षेमधून रँक मिळवून मुंबईतील आय.आय.टी. मधून पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर तेथूनच त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून पीएच.डी. यशस्वीरीत्या पूर्ण केली. अत्यंत कमी वयात पीएच.डी.चे शिक्षण घेतल्यामुळे डॉ. हर्षवर्धन रोंगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ.हर्षवर्धन रोंगे यांनी स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ज्ञानदान करण्याचे ठरविले आहे. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘डॉ.हर्षवर्धन यांनी अत्यंत कमी वेळात आणि तेही जागतिक पातळीवर असलेल्या आय.आय.टी. मुंबई मधून पीएच.डी. पूर्ण केली. यामुळे त्यांचे विशेष कौतुक वाटते.’ असे म्हणून डॉ.हर्षवर्धन यांची पाठ थोपटली. श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इंस्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये २५ व्या वर्धापनदिना निमित्त आयोजिलेल्या विशेष  कार्यक्रमामध्ये निवृत्त ब्रिगेडियर डॉ.सुनील बोधे यांच्या हस्ते व कृषी व ग्रामविकासाचे उत्कृष्ट मॉडेल म्हणुन विश्वात प्रसिद्ध असलेल्या हिवरे बाजार (जि. अहमदनगर) चे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व व्हाईस चेअरमन सौ.प्रेमलता रोंगे, यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. हर्षवर्धन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंढरपूर तालुका व आसपासचे शेतकरी, सरपंच, ग्रामसेवक, गोपाळपूरचे सरपंच विलास मस्के, सौ. सुनिता बोधे, सौ.मीनाक्षी रोंगे, विविध गावचे सरपंच यांच्यासह प्रशासकीय, खाजगी, वैद्यकीय, शैक्षणिक, कृषी, क्रीडा, राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवर, निवृत्त अधिकारी, तसेच स्वेरी परिवारातील सर्व मान्यवर उपस्थित होते.
     स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडा, जेष्ठ संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, संस्थेचे माजी उपाध्यक्ष व विश्वस्त आर.बी.रिसवडकर, विश्वस्त एन.एम. पाटील, विश्वस्त एस.टी.राऊत, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, इतर पदाधिकारी, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व  महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक, ग्रामस्थ यांनी डॉ. हर्षवर्धन रोंगे यांचे अभिनंदन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *