ताज्याघडामोडी

पंढरपूरची सुपुत्री सांगली पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी शबाना आतार ठरल्या पश्चिम महाराष्ट्रात एकमेव महिला श्वान पथक हॅन्डलर

पंढरपूरची सुपुत्री सांगली पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी शबाना आतार ठरल्या पश्चिम महाराष्ट्रात एकमेव महिला श्वान पथक हॅन्डलर 

पुणे येथे  ९ महिन्याचे प्रशिक्षणानंतर निवड 

मायेच्या स्पर्शाने मिळवली 
श्वानाच्या हृदयात जागा
प्रसूत माता बोटाच्या स्पर्शाने नवजात शिशूची मॉलिश करून त्याच्या शरीराला बळकटी देण्याचा प्रयत्न करते. आईच्या बोटाच्या स्पर्श आणि आवाज येवढेच त्याच्यासाठी काफी असते. केवळ आईच्या स्पर्शाने ते बाळ शांत होते. हाच धागा पकडून एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने त्या श्वानाच्या हृदयात जागा मिळवली. सहा महिन्याचं असताना त्या श्वानाची मॉलिश करून द्यायची. त्यांचा बोटाच्या स्पर्श आवाज आणि पावलांची चाहूल त्या श्वाना ला आनंद देणारी ठरते. त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही त्या श्वानाजवळ फिरकू शकत नाही. शबाना आतार असे त्या महिला कॉन्स्टेबलचे नाव. पश्चिम महाराष्ट्र मध्ये त्या एकमेव डॉग हॅण्डलर आहेत शबाना आतार या सांगली पोलिसात गुंन्हे श्वानपथक नोकरीला आहेत सुरुवातीपासूनच मुक प्राण्यांविषयी त्यांच्या मनात जिव्हाळा आहे. 
पोलिस खात्यात इतर पथकासह पुण्यात ९ महिन्याचे प्रशिक्षण
शबाना आतार यांना सांगली पोलिस मुख्यालयाकडून पुण्याला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. शिवाजी नगर येथील प्रशिक्षण केंद्रात क्राईम डॉग कुपर सोबत त्यांनी ९ महिने प्रशिक्षण घेतले. 29 ऑक्टोबर २०२० रोजी प्रशिक्षण पूर्ण झाले. २१ फेब्रुवारी म्हणजे नऊ महिन्यानंतर शबाना त्याला घेवून प्रत्यक्ष कर्तव्यावर हजर झाल्या.
श्वान पथकही असते.विशेष म्हणजे या पथकाची जबाबदारी पुरुषांकडे असते.मात्र, मुक प्राण्यांवर प्रेम असल्याने शबाना आतार यांनी श्वान हस्तक होण्याची इच्छा वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे.वरिष्ठांनी ही तिची विनंती मान्य करून कुपर नावाचा सहा महिन्याचा डॉग सांगली मुख्यालयात आणला.
प्रसूत माता क्षणभर सुध्दा नवजात शिशूपासून दूर जात नाही. अगदी त्याच प्रमाणे शबाना आतार  कुपर पासून दूर जात नव्हती.कुपर ९ महिन्यांचा होईपर्यंत त्याच्यावर बोटाच्या स्पर्शाने मॉलिश त्या करायच्या. त्यामुळे तो शबानाच्या  अंगावरचा झाला. त्याला आपली काळजी घेणारे कोणीतरी आहे, याचे समाधान आहे. तिच्या आवाजाने आणि पावलांची चाहूल ही त्याला आपलेसे करत होती. सतत ९ महिने त्याच्या संपर्कात राहिल्यानंतर कुपर आता कुटुंबातील सदस्याप्रमाणे झाला आहे. 
कुपरची लेकराप्रमाने काळजी मानवाप्रमाने मुक प्राण्यात ही करुणेचा झरा असतो आपल्यावर कोणी प्रेम करीत आहेत

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *