ताज्याघडामोडी

अजित पवार यांच्या कोरोना काळाती कामाचे कॅगच्या अहवालामध्ये कौतुक

३१ मार्च रोजी संपलेल्या राज्याच्या लेकापरीक्षा अहवाल आज विधीमंडळात सादर करण्यात आला. या अहवाल अनेक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

2020 21 दरम्यान राज्यातील 90 कार्यरत सार्वजनिक उपक्रमांपैकी 43 सार्वजनिक उपक्रमांनी 2043 कोटी रुपये नफा कमवला आणि 29 सार्वजनिक उपक्रमांचे पंधराशे पंच्याऐंशी कोटींची नुकसान झाले. CAG Report 11 सार्वजनिक उपक्रमांनी नफा कमवला नाही किंवा त्यांना नुकसानही झाले नाही, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने 439 कोटी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी 492 कोटी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ 255 कोटी ह्या प्रमुख नफा कमवणाऱ्या कंपन्या होत्या. आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ 939 कोटी मुंबई पुणे एक्सप्रेस लिमिटेड 290 कोटी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 141 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

तत्कालिन वित्तमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याला २०२०-२०२१मध्ये राजकोषीय तूट तीन टक्क्यांखाली म्हणजे २.६९ टक्क्यांपर्यंत आणण्यात राज्याला यश मिळाल्याचे अहवाल नमूद करण्यात आले आहे. विधानसभेत आज ‘कॅग’चा अहवाल मांडण्यात आला. या अहवालानुसार राज्यावरचे कर्ज २०१६ – १७ मध्ये चार लाख कोटी एवढे होते. ते आता पाच लाख ४८ हजार १७६ कोटी झाल्याचे म्हटले आहे.अहवालामध्ये तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी कोरोना काळात राबविलेल्या आर्थिक शिस्तीचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *