ताज्याघडामोडी

दोन्ही डोस घेऊनही नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे कोरोना पॉझिटिव

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही डोस घेतले होते तरीही त्यांना लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सुरज मांढरे यांना काही लक्षणे जाणवल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोनाचे दोन्ही डोस घेतले तरी कोरोना होऊ शकतो, हे यापूर्वीच तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे यामध्ये आश्चर्याची काही बाब नाही. मात्र प्रतिबंधात्मक लसीमुळे धोक्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे पात्र नागरिकांनी शक्य तितक्या लवकर लस घेण्याचं आवाहन, सरकारमार्फत केलं जात आहे.

लसीकरणानंतर एखाद्याला कोरोना होऊ शकतो का?

अमेरिकेतील काही लोकांना कोरोना लस घेऊनही कोरोना झाल्याचं समोर आलं होते. या केसेसना  असं संबोधण्यात आलं, ज्यांनी अधिक चिंता वाढवली आहे. दरम्यान काही अभ्यासांमधून म्हटले आहे की, शक्यता खूप कमी असली तरी या शक्य आहेत, जरी तुम्ही घेतलेले व्हॅक्सिन सर्वाधिक प्रभावी असले तरीही. अमेरिकेचे आघाडीचे शास्त्रज्ञ यांनी यांनी देखील यास दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते तुम्ही कोट्यवधी लोकांचे लसीकरण करता तेव्हा अशाप्रकारचे संक्रमण पाहायला मिळूच शकते. अँटनी हे अमेरिकेतील आघाडीचे वैज्ञानिक तर आहेतच पण त्याचबरोबर व्हाइट हाऊस कोव्हिड-19 ब्रिफिंगमध्ये ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन डिसीजेसचे डिरेक्टर आहेत.

2 एप्रिल रोजी, रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे  च्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की दोन डोस व्हॅक्सिनचा खुराक दुसऱ्या डोसच्या दोन आठवड्यानंतर 90 टक्के संक्रमण रोखण्यासाठी सुसज्ज असतो. तेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला fully vaccinated म्हणू शकता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *