

हवामान विभागाकडून यलो अर्लट जारी
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. तर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भात 13 आणि 14 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही स्थिती झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यात तर पावसाची प्रचंड बॅटिंग सुरु आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालं आहे. खडकवासाला धरणामध्ये पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून आज संध्याकाळी 26 हजार 809 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. मुसळधार पावसामुळे मुठा नदीला पूर आला.