ताज्याघडामोडी

अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडण्यास १५ ऑगस्टची मुदत

लाभ सोडणाऱ्या पहिल्या लाभार्थ्याचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केले स्वागत

पंढरपूर येथील तहसील कार्यालयात शासनाच्या वैशिष्टपूर्ण विभागीय अन्नधान्य वितरण योजनेद्वारे लक्ष्मी टाकळी व चळे या गावातील १० शिधापत्रिका धारकांनी अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडण्यासाठी अर्ज जमा केला. मा .उपायुक्त श्री त्रिगुण कुलकर्णी यांच्या आदेशाने पंढरपूर चे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर साहेब यांच्या सूचनेवरून पंढरपूर पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली opt out of subsidy of foodgiains या योजने अंतर्गत लक्ष्मी टाकळी व चळे येथील १० कार्डधारकांनी फॉर्म जमा केले त्या निमित्त मा. तहसीलदार साहेबांनी पुष्प देऊन कार्डधारकांचे स्वागत केले त्या बद्दल आपल्या पुरवठा विभागा मार्फत लाभार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व ईतर गावातील कार्डधारक यांनी स्वतः पुढाकार घेऊन योजनेतून बाहेर पडावे जेणेकरुन वंचित लोकांना त्याचा लाभ घेता येईल असे आव्हान विभागीय उपायुक्त श्री. त्रिगुण कुलकर्णी , जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे व तहसिलदार बेल्हेकर साहेब यांनी केले. तसेच पुरवठा विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी यांना जनतेच्या सोयीसाठी विविध कार्यप्रणाली कशा राबवाव्यात याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *