ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या ७७ गटांचे आरक्षण जाहीर

पंढरपूर तालुक्यातील अनेक प्रस्थापितांचे गट आरक्षित

 

अनेक महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद निवडणूक साठीचे आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार अंजली कुलकर्णी, कारकून तुकाराम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन भवनात दुपारी तीन वाजता आरक्षण सोडत पार पडली. सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातून एकूण 77 जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट आहेत. या एकूण गटातून आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतील अनेक दिग्गज नेत्यांना धक्के बसले आहेत तर अनेक इच्छुक नेत्यांचे मार्ग आता मोकळे झाल्याचे चित्र पाहायला मिळते. एकमेव अनुसूचित जम ातीचे आरक्षण हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी या गटासाठी पडले आहे मात्र ही जागा म हिलेसाठी राखीव करण्यात आली आहे. अनुसूचित जमातीनंतर अनुसूचित जातीच्या 12 जागेचे आरक्षण काढण्यात आले त्यानंतर 20 ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण झाले शेवटी सर्वसाधारण जागांसाठी आरक्षण काढण्यात आले. विशेष म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यात सातच्या सात जिल्हा परिषदेच्या जागा या महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. प्रणिती नामदेव गायकवाड या बालिकेच्या हस्ते सर्व चिठ्ठ्या काढण्यात आल्या. तालुका निहाय आरक्षण पुढील प्रमाणे आहे. करमाळा तालुक्यात एकूण 6 जिल्हा परिषद गटत आहेत. यामध्ये पंडे व वीट हा गट सर्वसाधारण झाला आहे. अनुसूचित जातीसाठी कोर्टी, चिकलठाण व वांगी या गटाचा समावेश आहे. सर्व साधारण महिलेसाठी केम हा गट झाला आहे.

    माढा तालुक्यात 8 जि.प.गट आहेत. यामध्ये भोसरे अनुसूचित जाती महिला साठी राखीव, म्हैसगाव सर्वसाधारण महिला, उपळाई बु्र.ओबीसी, लवुळ सर्वसाधारण, कुर्डू अनुसूचित जाती महिलारांझणी सर्वसाधारण महिला, टेंभुर्णी सर्वसाधारण महिला, मोंडनीम
अनुसूचित जाती.
बार्शी तालुक्यातू एकूण 6 जि.प.गट आहेत. यामध्ये उपळाई ठोंगे ओबीसी
महिला, पांगरी सर्वसाधारण महिला, उपळे दुमाला, पानगाव, मालवंडी हे तीन
गट सर्वसाधारण झाले आहेत. शेळगाव आर गट अनुसूचित जाती महिलांसाठी
राखीव ठेवण्यात आला आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यात एकून तीन गट आहेत यामध्ये नानज आणि दारफ
ळ बी.बी हे सर्वसाधारण महिलेसाठी तर कोंडी हे सर्वसाधारण झाले आहे.
मोहोळ तालुक्यातून एकूण 6 जि.प.गट आहेत. यामध्ये नरखेड व कामती
बु्र.हे दोन गट सर्वसाधारण महिला, आष्टी अनुसूचित जाती महिला, पोखरापूर
अनुसूचित जाती, पेनूर सर्वसाधारण, कुरूल ओबीसी महिला राखीव ठेवण्यात
आला आहे.

पंढरपुर तालुक्यात एकूण 10 जि.प.गट आहेत. यामध्ये भोसे सर्वसाधारण,
करकंब ओबीसी महिला, रोपळे सर्वसाधारण, पुळूज ओबीसी महिला, गोपाळपूर
ओबीसी, गुरसाळे ओबीसी, भाळवणी सर्वसाधारण महिला, वाखरी सर्वसाधारण
महिला, लक्ष्मी टाकळी सर्वसाधारण महिला, कासेगाव ओबीसी.

माळशिरस तालुक्यात 11 जिल्हा परिषद गट आहेत. यामध्ये 11 जि.प.गट
आहेत. यामध्ये दहिगाव ओबीसी महिला, फोंडशिरस ओबीस. संग्रामनगर,
यशवंत नगर, माळिनगर, बोरगाव, मांडवे, पिलीव हे गट सर्वसाधारण झाले
आहेत. वेळापूर ओबीसी महिलेसाठी राखीव. कन्हेर ओबीसी, तांदूळवाडी
अनुसूचित जाती.
सांगोला तालुक्यात एकूण 8 जि.प.गट आहेत. यामधून महुद बु्र.,एकतपूर,
घेरर्डी हे गट सर्वसाधारण तर कडलास, अकोला, चोपडी, कोळा हे चारही गट
सर्वसाधारण महिलेसाठी आहेत. तर वाढेगाव हा गट ओबीसी साठी निघाला
आहे.
मंगळवेढा तालुक्यात एकूण 5 जि.प.गट आहेत. यामध्ये संत दामाजी
नगर व संत चोखोबा नगर अनुसूचित जाती महिलासाठी राखीव, हुलजंती
ओबीसी, नंदेश्वर सर्वसाधारण महिला, भोसे सर्वसाधारण अशी आरक्षण सोडत
निघाली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात एकूण 7 जि.प.गट आहेत. याध्ये बोरामणी,
कुंभारी, हत्तूर, भंडारकवठे हे गट सर्वसाधारण महिलांसाठी, तर वळसंग,
ओबीसी महिला, होटगी एसटी महिलासाठी राखीव, मंद्रुप ओबीसी महिलेसाठी
राखीव ठेवण्यात आला आहे.
अक्कलकोट तालुक्यात एकूण 7 जि.प.गट आहेत. यामध्ये चपळगाव
ओबीसी, वाघदरी सर्वसाधारण महिला, जेऊर ओबीसी महिला, मंगरूळ
सर्वसाधारण महिला, नागणसुरू ओबीसी तर सलगर आणि तोळणून हे
सर्वसाधारण गट आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *