ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल कारखान्यामार्फत ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांना पहिल्या हप्त्याचे वाटप सुरू

गुरुवार दि.२८.०७.२०२२ रोजी कारखाना कार्यस्थळावर श्री विठ्ठल सह.सा.का.लि.,वेणूनगरच्या गळीत हंगाम २०२२-२३ ची पुर्वतयारी सुरु असून ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचे श्री विठ्ठल सर्व सेवा संघामार्फत करार करण्यात येत आहेत. ऊस तोडंणी व वाहतूक कराराचे कामकाज चालू असून ट्रक/ट्रॅकटर ६०० डपींग ४०० व बैलगाडी ४५० यंत्रणेसाठी अर्ज आलेले असून करार केलेले वाहन मालकांना पहिला हप्ता रु.२.०० लाख प्रति वाहन या प्रमाणे वाटप कारखान्याचे व्हाईत चेअरमन सौ.प्रेमलता रोंगे यांचे शुभहस्ते व श्री बी.पी.रोंगेसर तसेच ऊस तोडणी वाहतूक समितीचे व संघाचे सदस्य संचालक श्री दिनाकर चव्हाण,श्री नवनाथ नाईकनवरे, जनक भोसले, दत्तात्रय नरसाळे,साहेबराव नागणे, कालिदास पाटील, प्रविण कोळेकर, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे,कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक श्री
डी.आर.गायकवाड,डी.व्ही.पी.पिपल मल्टीस्टेट शाखा वेणुनगर-गुरसाळेचे जनरल मॅनेजर श्री शशिकांत जगताप, मॅनेजर श्री महेश दांडगे, कारखान्याचे उपशेती अधिकारी श्री नरसाळे, संघ मॅनेजर श्री धनाजी घाडगे इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीत करणेत आले.
      कारखान्याचे कार्यक्षेत्रामध्ये ३११००० एकर ऊसाची नोंद कारखान्याकडे झालेली असून या ऊसाचे क्षेत्रामधून अंदाजे १२,५०,००० मे.टन ऊत्त गाळपासाठी उपलब्ध होईल. या संपुर्ण ऊसाचे गाळप करण्याचे मा.संचालक मंडळाने उद्दोष्ट ठेवलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *