ताज्याघडामोडी

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हॉटेल,बेकरी,स्वीट होम चालकांनी सोलापूर अन्न प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे  !

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हॉटेल,बेकरी,स्वीट होम चालकांनी सोलापूर अन्न प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे  !

प्रदीप राऊत (सह.आयुक्त अन्न विभाग सोलापूर) यांचे आवाहन 

पंढरपूरचे अन्न निरीक्षक कुचेकर पूर्णवेळ उपस्थित रहाणार ? 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत असून सर्वसामान्य नागरिकांची वर्दळ असणाऱ्या हॉटेल,बेकरी पदार्थ विक्रेते,स्वीट होम आदी अन्न पदार्थ विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी यासाठी अन्न विभाग उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून सोलापूर अन्न विभागाने एक पत्रक काढले असून त्या नुसार खाद्य पदार्थ विक्रेत्यांना विविध सूचना केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन करावे व कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे असे  आवाहन  सह.आयुक्त प्रदीप राऊत यांनी केले आहे.   

    सोलापूर अन्न विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार सर्व हॉटेल चालकांनी घ्यावयाची दक्षता 

१) आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांनी ठराविक वेळेनंतर किमान २० सेकंद हात स्वछ धुवावेत. २) कामगारांनी अन्न पदार्थ बनविताना स्वछ हेडकॅप,हॅन्डग्लोव्स,ऍप्रॉन यांचा वापर करावा. ३) कामगारांनी शिंकताना हातरुमालाचा वापर करावा. ४)  कामगारांनी अनावश्य्क ठिकाणी (पडदे आदी )स्पर्श करणे टाळावे. ५) कामगारांना सर्दी खोकला ताप आदी लक्षणे असल्यास  अशा कामगारांना रोखावे. ६) कामगारांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. ७) स्वयंपाक घरात नियमितपणे जंतुनाशकाचा वापर करून फरशी आदी स्वच्छ करावी. ८) स्वयंपाका साठी वापरात येणारी भांडी गरम पाण्याने स्वच करावीत. ९) आस्थापनेत डोअर हॅन्डल वापरात येऊ नये याची दक्षता घ्यावी. १०) टेबल वरील कापड काढून टाकावे तसेच ग्राहकांनी मेनू कार्ड वैगरे याचा स्पर्श टाळावा.   ११) ग्राहकांना व कामगारांना सानिटरायजरचा वापर करून हात स्वच्छ धुता यावेत यासाठी सोय करावी. 

       आदी सूचना अन्न विभागाकडून करण्यात आल्या असून जनतेने व आस्थापना चालकांनी गंभीरपणे या सूचनांचे पालन करून कोरोनाचा प्रसार रोखण्यास शासनास मदत करावी असे आवाहन प्रदीप राऊत (सह. आयुक्त अन्न विभाग सोलापूर ) यांनी केले आहे.  

     पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी हॉटेल्स, खानावळ,स्वीट होम यांची संख्या मोठी आहे तसेच विविध खाद्य पदार्थ विक्रेतेही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. त्याच बरोबर रस्त्यावर उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री करणारे अनेक व्यवसायिक असून या पैकी अनेकांकडे अन्न विभागाचा परवानाच नाही अशी परिस्थिती आहे.या आस्थपानांनी अन्न प्रशासनाच्या सूचनेचे पालन न केल्यास कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत असून अन्न निरीक्षक म्हणून पंढरपूरची जबाबदारी असलेले कुचेकर हे तूर्तास तरी व्हिजिटिंग ऑफिसर म्हणून काम करीत आहेत.ते पूर्णवेळ पंढपुरात उपलब्ध नसल्याने तसेच त्याचा मोबाईलही बहुतांश वेळ बंद असल्याने जर सह.आयुक्तांनी केलेल्या सूचनेचे कुठे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास व दक्ष नागरिकाने तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास अन्न निरीक्षक कुचेकर हे उपलब्ध  होणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. माघी यात्रा नियोजनाच्या बैठकीवेळी अन्न निरीक्षक उपस्थित नसल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती हि बाब पंढरपूरकर अजून विसरलेले नाहीत.         

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *