ताज्याघडामोडी

सोमवारपासून खिशाला बसणार कात्री, ‘या’ वस्तू महागणार? ‘जीएसटी’मध्ये केले मोठे बदल

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने काही वस्तुंवरील जीएसटीमध्ये बदल केला आहे. जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा जीएसटी १८ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे.

यात काही रोजच्या दैनंदिन वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे सोमवारपासून आपल्या खिशाला कात्री लागणार आहे. घरगुती वस्तू, हॉटेल आणि बँक सेवांसह इतर काही गोष्टींसाठी जास्त खर्च करावे लागणार आहेत. चंदीगड येथे झालेल्या जीएसटी (GST) कौन्सिलच्या ४७ व्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत कोही वस्तूंवरील जीएसीट (GST) ५ टक्क्यांवरुन १२ टक्के करण्यात आला आहे. छपाईच्या वस्तू, लेखन किंवा चित्र काढण्यासाठी वापरण्यात येणारी शाई, एलईडी दिवे, दिवे आणि फिक्स्चर आणि त्यांचे मेटल प्रिंटेड सर्किट बोर्ड महाग होणार आहेत. यापूर्वी या सर्वांवर १२ टक्के दराने जीएसटी आकारला जात होता, मात्र १८ जुलैनंतर हा कर १८ टक्के होईल. सोलर वॉटर हीटर्स आणि सिस्टीमवरील जीएसटी दर ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे.

तसेच चामड्यांपासून बलणाऱ्या वस्तू, पादत्राणे वरील जीएसटी ६ टक्क्यांवरुन १२ टक्के करण्यात आला आहे. आता रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रोही महागणार आहे. आतापर्यंत अशा कामांसाठी दिलेल्या वर्क कॉन्ट्रॅक्टवर १२ टक्के जीएसटी (GST) लागू होता, तो आता १८ टक्के करण्यात आला आहे. टेट्रा पॅकवरील दर १२ टक्क्यांवरून १८ टक्के आणि कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील दर ०.२५ टक्क्यांवरून १.५ टक्के करण्यात आला आहे.

या वस्तूंच्या वाढणार किंमती

१) छपाई, लेखनाची शाई – १८%, २)कटिंग ब्लेड, चाकू, पेपर चाकू, पेन्सिल शार्पनर आणि ब्लेड, चमचे, काटे, लाडू, स्किमर्स, केक-सर्व्हर -१८%, ३) विजेवर चालणारे पंप , खोल ट्यूबवेल टर्बाइन पंप, सबमर्सिबल पंप, सायकल पंप -१८%, ४) धान्य करण्याचे यंत्र, दळण उद्योग किंवा धान्य प्रक्रियेसाठी यंत्रसामग्री, पवनचक्क्या, पिठाच्या गिरण्या-१८%, ५) अंडी, फळे किंवा इतर कृषी उत्पादने आणि त्यांची साफसफाई करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रे, मिल्किंग मशीन आणि डेअरी मशिनरी -१८%.

६) एलईडी दिवे, दिवे आणि फिक्स्चर, त्यांचे मेटल सर्किट बोर्ड -१८%, ७) शिक्के- १८%, ८) सोलर वॉटर हीटर्स आणि सिस्टम -१२% , ९) तयार लेदर / कॅमोइस लेदर – १२%, १०) नकाशे आणि इतर हायड्रोग्राफिक तक्ते, अॅटलसेस, भिंतीचे नकाशे, स्थलाकृतिक योजना आणि ग्लोब, छापलेले नकाशे – १२%, ११) १,००० रुपयांपर्यंतचा हॉटेल मुक्कामवर – १२%, १२) ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रूग्णालयाची खोलीच्या भाड्यावर ५% वाढवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *