ताज्याघडामोडी

खास डिझाईन केलेल्या बेल्टमध्ये सापडली तब्बल 12 किलो सोन्याची बिस्कीटे, कस्टम विभागाची मोठी कारवाई

आजकाल काही लोक सहज पैसे मिळवण्यासाठी सोन्याच्या तस्करीसारखे, अवैध काम करत आहेत. मात्र, काही वेळा हे गुन्हेगार पोलिसांच्या हाती सहज लागतात. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने कारवाई करुन, तब्बल 12 किलो सोन्याची बिस्कीटे जप्त केली आहे. खास तयार केलेल्या पट्ट्यातून १२ किलो सोन्याची तस्करी करणाऱ्या सुदानी नागरिकाला अटक केली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर एका सुदानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या खास डिझाईन केलेल्या पट्ट्यातून 12 किलो सोने जप्त करण्यात आले असून; ते मुंबईत तस्करी करत होते. कस्टम अधिकाऱ्यांनी सोने जप्त करून पुढील कारवाई सुरू केली असता, आरोपीच्या काही साथीदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ५ कोटी ३८ लाख इतकी आहे.

आरोपीला पळवण्याच्या प्रयत्नात त्याच्या साथीदारांनी, विमानतळावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. परंतु, नंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सोने तस्करांसह सर्व लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 6 जणांना तस्करीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहीती, अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *