ताज्याघडामोडी

स्वेरीकडून येत्या १६ सप्टेंबर पासून एमएचटी-सीईटी परीक्षा २०२० साठी मोफत ऑनलाईन वर्ग सुरु

स्वेरीकडून येत्या १६ सप्टेंबर पासून एमएचटी-सीईटी परीक्षा २०२० साठी मोफत ऑनलाईन वर्ग सुरु

स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांची माहिती

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट,पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून एमएचटी-सीईटी २०२०’  या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने येत्या बुधवारदि. १६ सप्टेंबर पासून ते ०५ आक्टोंबर २०२० या वीस दिवसाच्या कालावधीत मोफत ऑनलाईन सराव वर्गांचे आयोजन करण्यात आलेले असून या ऑनलाईन सराव वर्गांचा लाभ सायन्समधून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी घेवू शकतात.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.

          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमएचटी-सीइटी २०२० ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. दि. ९ सप्टेंबर २०२० ला आलेल्या सीईटी सेलच्या परिपत्रकानुसार सदर परीक्षा आता १ ऑक्टोबर २०२० ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा नाहक वाया जाणारा वेळ लक्षात घेता येत्या बुधवारदि. १६ सप्टेंबर पासून ते दि.०५ ऑक्टोबर २०२० पर्यंत स्वेरीने एमएचटी-सीइटी २०२० ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन वर्गांचे आयोजन केलेले आहे. यामध्ये फिजिक्सकेमेस्ट्री आणि मॅथ्स या विषयावर स्वेरीतील तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. या सराव वर्गासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच प्रत्येक दिवसाच्या व विषयांच्या लेक्चर्सच्या लिंक्स विद्यार्थ्यांना त्या त्या दिवशी सकाळी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या शंका विचारण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी सायन्स शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या मोफत ऑनलाईन वर्गांचा फायदा घ्यावा असे आवाहन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रा. उतम अनुसे- ९१६८६५५३६५ व ८९२९१००६१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *