ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे अवैध वाळू उपसा सुरु असल्याचे उघड 

पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे अवैध वाळू उपसा सुरु असल्याचे उघड 

महसूल प्रशासनाच्या कारवाईत २० ब्रास वाळू साठा जप्त,दोघांविरोधात गुन्हा दाखल 

पंढरपूर तालुक्यातील व्होळे,कौठाळी,चिंचोली भोसे येथे अहोरात्र अवैध वाळू उपसा होत असल्याची चर्चा होत असतानाच चिंचोली भोसे येथे नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईमुळे महसूल प्रशासन अलर्ट झाले आहे.याचीच परिणीती म्हणून प्रांताधिकारी पंढरपूर यांनी दिलेल्या आदेशानुसार पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे कारवाई करण्यात आली आहे. 
  व्होळे येथे कार्यरत असलेले तलाठी शाहेदा इन्नुस काझी यांनी या बाबत करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सोमवार दिनांक 16/03/2020 रोजी सकाऴी 10/30वाचे सुमारास उपविभागीय दंडाधिकारी पंढरपुर विभाग पंढरपुर यांनी मंडल अधिकारी दिपक शिंदे,भंडीशेगाव विभाग, गावकामगार तलाठी कौठाऴी ता.पंढरपुर मौजे व्होऴे ता.पंढरपुर या गावाचे भिमा नदी पात्रातुन चोरुन वाऴु उपसा करुन शेतामध्ये वाऴु साठा केलेला आहे अशी माहिती मिळाली आहे व व्होऴे येथे जावुन वाऴु साठ्यावर कारवाई करावी अशा सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत पाटील, पोलीस हवालदार हरिहर, पोलीस नाईक सुऴ, पोलीस काँन्स्टेबल भोसले करकंब पोलीस ठाणे यांच्यासह मंडल अधिकारी दिपक शिंदे
 व स्वतः फिर्यादी काझी हे सर्व मिळून व्होऴे गावातील भिमा नदी पात्राचे कडेला गेलो असता लक्ष्मण नाना भुसनर रा. व्होऴे ता.पंढरपुर यांचे शेतीचे मऴईमध्ये नदी पात्रातुन चोरुन वाऴु उपसा करुन 10 ब्रास वाऴु किंमत 70,000/- रुपयेचा वाऴुचा साठा केलेला दिसला तसेच त्यांचे शेजारी आण्णा विष्णु खंकाऴ रा. व्होऴे ता. पंढरपुर यांचे शेतीचे मऴईमध्ये भिमा नदी पात्रातुन चोरुन वाऴु उपसा करुन 10ब्रास वाऴु किंमत 70,000/- रुपयेचा वाऴुचा साठा केलेला दिसला ती वेऴ 11/30वाची होती. लागलीच मी वरील दोन्ही ठिकाणचे वाऴु साठ्याचा दोन पंचासमक्ष पंचनामा करुन दोन्ही ठिकाणचा मिऴुन 20ब्रास वाऴु किंमत 1,40,000/- रुपयेचा वाऴुचा साठा टिपरमध्ये भरुन शासकीय गोडावुन पंढरपुर येथे जमा करण्यात आलेला आहे.
यातील इसम नामे 1) लक्ष्मण नाना भुसनर 2) आण्णा विष्णु खंकाऴ दोघे रा. व्होऴे ता. पंढरपुर यांनी मौजे व्होऴे गावाचे शिवारातील भिमा नदी पात्रातुन चोरुन वाऴु उपसा करुन स्वःचे शेतातील मऴईमध्ये साठा केलेला आहे म्हणुन वरील दोघांचे विरुध्द सरकार तर्फे फिर्याद दाखल करण्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *